मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:31 PM2023-06-06T13:31:25+5:302023-06-06T13:32:59+5:30

पुढील काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात. याकाळा भगवान आपल्या भक्तांना दर्शनही देत नाहीत.

Lord Jagannath will be treated by Ayurveda in Mathura; doors closed for the few days know the whole matter | मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

मथुरा : हिंदू धर्मात ब्रिज भूमिला एक वेगळे महत्व आहे. ब्रज भूमिवर स्वतः देवता वास करतात असे बोलले जाते. येथे हजारो मंदिरे आहेत. याच हजारो मंदिरांत एक मंदिर आहे ते भगवान जगन्नाथांचे. येथील भक्तांची श्रद्धा आहे की, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेनंतर भगवान जगन्नाथ आजारी पडतात. यामुळे पुढील काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात. याकाळा भगवान आपल्या भक्तांना दर्शनही देत नाहीत.

पौर्णिमेच्या दिवशी एक तास चालला अभिषेक - 
हे मंदिर वृंदावनच्या परिक्रमा रोड ज्ञानगुदडीजवळ आहे. ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त रविवारी भगवान जगन्नाथांना जल यात्रा करवली गेली. जगन्नाथांना विविध नद्यांचे पाणी, वनौषधी आणि फळांच्या रसाने तासभर अभिषेक घालण्यात आला. यानंतर, जगन्नाथजी आजारी पडले. आता 15 दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतील. या 15 दिवसांत आयुर्वेद पद्धतीने जगन्नाथांवर उपचार चालणार आहेत. यानंतर 20 जूनला रथ यात्रेच्या स्वरुपात नगरात फिरून जगन्नाथजी आपल्या भाविकांना दर्शन देतील.

यादरम्यान भाताचा भोग दिला जाणार नाही -
भगवान जग्नाथांची प्रकृती बिघडल्यानंतर, त्या काळात त्यांना भात दिला जात नाही. 16 दिवसांनंतर, सूर्योदयावेळी भगवान जगन्नाथांना दूध-दही आणि तुपासह इतर गोष्टींच्या सहाय्याने अभिषेक होतो. यानंतर, भगवान जगन्नाथांना गाईचे दर्शन करवले जाते. यानंतर भक्तांसाठी मंदिराची दारे खुली केली जातात. यावेळी वृंदावनमध्ये 1 जुलैला भगवान जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 

Web Title: Lord Jagannath will be treated by Ayurveda in Mathura; doors closed for the few days know the whole matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.