...तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत; सुब्रमण्यम स्वामींची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:53 AM2019-05-02T09:53:14+5:302019-05-02T09:53:53+5:30

भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.

lok sabha election 2019 subramanian swamy if bjp gets 220 230 modi may not be prime minister? | ...तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत; सुब्रमण्यम स्वामींची भविष्यवाणी

...तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत; सुब्रमण्यम स्वामींची भविष्यवाणी

googlenewsNext

नवी दिल्लीः भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीत 220-230 जागा जिंकल्यास मोदी कदाचित पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपाचं नेतृत्वही बदलेल, असा दावाही स्वामींनी केला आहे.

ते म्हणाले, भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता न आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. परंतु हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल, हे सांगण्यासही स्वामी विसरले नाहीत. 'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे.


भाजपाला 230 किंवा त्याहून कमी जागा मिळाल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. समजा भाजपानं 220 किंवा 230 जागा जिंकल्या, आणि एनडीएच्या मित्र पक्षांना 30 जागा मिळाल्या, तर तो आकडा 250पर्यंत जाईल. पण तरीही बहुमतासाठी 30 जागांची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान राहणार की नाही, हे एनडीएतील इतर मित्र पक्ष ठरवणार आहेत. आम्हाला 30 किंवा 40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षानं जर मोदींना पंतप्रधान करण्यास विरोध केला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान करणार नाही, असंही स्वामी म्हणाले आहेत.

मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. कारण गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे. तसेच गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत. मायावती एनडीएत येतील का, या प्रश्नालाही स्वामींनी उत्तर दिलं. मायावतींनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये बसपा हा पक्ष भाजपाच्या विरोधात लढतोय. अशातच मायावती कशा सोबत येतील. मायावतींनी ठरवल्यास बसपा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. माझा यावर काहीच आक्षेप नाही. 

Web Title: lok sabha election 2019 subramanian swamy if bjp gets 220 230 modi may not be prime minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.