तोकडे कपडे निर्भया प्रकरणांना चालना देतात म्हणणाऱ्या शिक्षिकेचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 11:31 AM2018-02-02T11:31:36+5:302018-02-02T11:33:09+5:30

रायपूरच्या केंद्र विद्यालयातील शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

KV teacher suspended for saying Nirbhaya asked for rape | तोकडे कपडे निर्भया प्रकरणांना चालना देतात म्हणणाऱ्या शिक्षिकेचं निलंबन

तोकडे कपडे निर्भया प्रकरणांना चालना देतात म्हणणाऱ्या शिक्षिकेचं निलंबन

googlenewsNext

रायपूर-  तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या रायपूरच्या केंद्र विद्यालयातील शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे. 
शिक्षिकेच्या विधानानंतर शाळेतील विद्यार्थी व पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक तपासात शिक्षिकेचं वक्तव्य खरं असल्याचं आढळून आलं आहेत. त्यानुसार त्यांचं निलंबन झालं असून पुढील शिक्षिकेची दुसऱ्या शाळेत बुधवारी संध्याकाळी बदली करण्यात आल्याची माहिती केव्ही शाळेचे मुख्याध्यापक भगवानदास अहिरे यांनी दिली आहे. 

पालकांच्या लेखी तक्रारीनंतर मी एका कमिटीची स्थापना केली. घटनेच्या 24 तासाच्या आत कमिटीने प्राथमिक रिपोर्ट सादर केला, अशी माहिती केव्हीच्या डेप्युटी कमिशनरने दिली आहे. शिक्षिकेची केव्ही 2 शाळेत तात्पुरती बदली करण्यात आली असून उच्चस्तरीय समिती चौकशीसाठी स्थापन करण्यात आली आहे. 

नेमकं काय म्हणाली होती शिक्षिका?
तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं या शिक्षिकेचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर निर्भया प्रकरणात निर्भयाची कशी चुकी होती, हे विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचाही त्या शिक्षेकेने पूर्ण प्रयत्न केला आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे निर्भया प्रकरण घडायला चालना देतात. ज्या मुली रात्री बाहेर फिरतात त्यांच्याबरोबर अशा घटना घडू शकतात, असं या शिक्षिकेने म्हंटलं. 

Web Title: KV teacher suspended for saying Nirbhaya asked for rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.