VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:06 PM2024-02-04T16:06:30+5:302024-02-04T16:07:58+5:30

Jammu Kashmir Kupwara News: बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद, गरोदर महिलेसाठी भारतीय सैनिक बनले देवदूत.

Kupwara, jammu kashmir: Vilgam Army Camp on Saturday rescued a pregnant woman amid heavy snowfall | VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण

VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण

Jammu Kashmir Kupwara News: देशाच्या सीमेवर तैणात असलेले आपले जवान अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. अनेकदा हे सैनिक आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाटी वैयक्तिकरित्याही धावून जातात. जाते प्रकरण जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील आहे. सैन्याच्या जवानांनी देवदूत बनून एका गरोदर महिलेचे प्राण वाचवले. 

वेळीच रुग्णालयात दाखल केले
कुपवाडा येथे सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे, बर्फवृष्टीमुळे कुपवाड्यातील अंतर्गत भागातील बहुतांश रस्ते बंद झाले आहेत. वाहनांची वाहतूकही ठप्प आहे. अशा परिस्थितीत काल रात्री(दि.3) 11.45 च्या सुमारास विलगाम आर्मी कॅम्पमधील एसएचओंना महिलेचा पती मुश्ताक अहमद यांचा कॉल आला. गरोदर पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वाचवण्याची विनंती मुश्ताक यांनी केली. 

कुटुंबाने मानले आभार 
यानंतर त्या गरोदर महिलेच्या मदतीसाठी भारतीय लष्कर पुढे सरसावले आणि तिला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे, सैनिकांनी मध्यरात्री 2 ते 3 फूट बर्फात सुमारे 8 किमी पायी प्रवास केला. रस्त्यावर प्रचंड बर्फ असूनही बचाव पथक वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यामुळे महिलेला वेळेवर उपचार मिळाले. यानंतर पीडित कुटुंबाने भारतीय लष्कर आणि विलगाव पोलिसांसह डॉक्टरांचे आभार मानले.

Web Title: Kupwara, jammu kashmir: Vilgam Army Camp on Saturday rescued a pregnant woman amid heavy snowfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.