अबब! पतीच्या पासपोर्टवर पत्नीने लिहिले नातेवाईकांचे नंबर अन् रेशनिंगचा हिशेब, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:08 PM2019-03-28T20:08:48+5:302019-03-28T20:11:10+5:30

विदेशात फिरणं ही भारतीयांच्या आवडीची गोष्ट आहे. परदेशवारी करण्यासाठी बऱ्याचदा भारतातील लोक पासपोर्ट बनवण्यासाठी घाई करत असतात.

kerala woman turns husband passport into phone directory viral video? | अबब! पतीच्या पासपोर्टवर पत्नीने लिहिले नातेवाईकांचे नंबर अन् रेशनिंगचा हिशेब, व्हिडीओ व्हायरल

अबब! पतीच्या पासपोर्टवर पत्नीने लिहिले नातेवाईकांचे नंबर अन् रेशनिंगचा हिशेब, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली- विदेशात फिरणं ही भारतीयांच्या आवडीची गोष्ट आहे. परदेशवारी करण्यासाठी बऱ्याचदा भारतातील लोक पासपोर्ट बनवण्यासाठी घाई करत असतात. पासपोर्ट तयार करण्याची क्लिष्ट असलेली पद्धतही आता फार सोपी झालेली आहे. सध्याच्या ऑनलाइन युगामध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करणं फारसं अवघड काम राहिलेलं नाही.

एका छोट्याशा ऑनलाइन रजिस्ट्रेशननंतर इंटरव्यू क्लियर केल्यानंतर पासपोर्ट सहज मिळून जातो. पासपोर्ट फक्त ट्रॅव्हल करण्यासाठीच नाही तर एक आयडी प्रूफ म्हणूनही उपयोगी ठरतो. अनेक मल्टी नॅशनल कंपन्या पासपोर्टशिवाय जॉब ऑफर करत नाहीत. अशातच पासपोर्ट तयार करणं अत्यंत आवश्यक झालं आहे. त्यामुळे पासपोर्टही आपण फार जपून ठेवत असतो. कारण स्वदेशातून परदेशात जाण्यासाठी या पासपोर्टची नितांत गरज असते.

परंतु केरळमधल्या एका महिलेला पतीच्या पासपोर्टचं महत्त्व न समजल्यानं तिने त्याचा भलत्याच कामासाठी वापर केला. त्या पासपोर्सला तिने फोनची डायरी बनवली आहे. इतकंच नव्हे, तर पासपोर्टमध्ये रेशनिंगचा हिशेबही लिहिला आहे. फोन डायरेक्टरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण पतीच्या ज्या पासपोर्टवर महिलेनं नातेवाईकांचे नंबर आणि रेशनिंगचा हिशेब लिहिला आहे, तो फारच जुना आहे. तो आता काहीही कामाचा नाही. त्यामुळेच महिलेनं पासपोर्टला फोन डायरेक्टरी बनवलं आहे. त्यावर रेशनिंगचा हिशेबही लिहिलेला आहे.   

Web Title: kerala woman turns husband passport into phone directory viral video?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.