रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:26 PM2024-02-13T12:26:29+5:302024-02-13T12:33:36+5:30

सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत.

Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has alleged that the central government is promoting the BJP by placing photos of Prime Minister Narendra Modi on ration shops for the 2024 Lok Sabha elections | रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

Lok Sabha Election 2024: लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अब की पार ४०० पार'चा नारा दिला. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकत आहेत. सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत. अलीकडेच मोदींनी सांगितले की, एनडीए ४०० पार तर भाजपा ३७० हून अधिक जागा जिंकेल. भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू असताना केरळ सरकारने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केरळमधील पिनाराई विजयन सरकारने जाहिरातींवरून सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवला. 

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केरळमधील रेशन दुकानांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लोगोसह असलेले मोदींचे फोटो, बॅनर्स लावणे जाणार नाहीत. केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमदार पी. अब्दुल हमीद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर शिक्कामोर्तब केला. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सरकार रेशन दुकानांवर जाहिरात लावून प्रचार करत आहे, त्यांच्या प्रचाराचा हा एक भाग असल्याने आम्ही विरोध केला, असेही विजयन यांनी सांगितले. 

जाहिरातींवरून राजकारण 
मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने ही योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्या, बॅनर्स लावून भाजपा प्रचार करत आहे. याला आम्ही शक्य तेवढा विरोध करू आणि हे चुकीचे असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करू. निवडणूक आयोगाशी देखील याबाबत चर्चा करता आली तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. 

केंद्राचे निर्देश काय आहेत?
केरळमधील १४ हजारहून अधिक रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले फ्लेक्स आणि बॅनर लावावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक रेशन दुकानाबाहेर मोदींचे फोटो असलेले बॅनर्स आणि त्यांनी राबवलेल्या योजनेची माहिती नमूद असायला हवी, अशी केंद्र सरकारची सूचना असल्याचे केरळचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जी.आर. अनिल यांनी सांगितले. 

Web Title: Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has alleged that the central government is promoting the BJP by placing photos of Prime Minister Narendra Modi on ration shops for the 2024 Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.