काश्मीरमध्ये झोपडयांना आग, १० मजूर ठार

By admin | Published: January 1, 2016 12:37 PM2016-01-01T12:37:05+5:302016-01-01T12:43:36+5:30

जम्मू-काश्मीरच्या रामबान जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा बांधकाम मजुरांच्या झोपडयांना लागलेल्या भीषण आगीत होरपळून १० जण मृत्यूमुखी पडले.

In Kashmir, slums fire, 10 laborers killed | काश्मीरमध्ये झोपडयांना आग, १० मजूर ठार

काश्मीरमध्ये झोपडयांना आग, १० मजूर ठार

Next

ऑनलाइन लोकमत 

जम्मू, दि. १ - जम्मू-काश्मीरच्या रामबान जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा बांधकाम मजुरांच्या झोपडयांना लागलेल्या भीषण आगीत होरपळून १० जण मृत्यूमुखी पडले.
नाशेरी बोगद्याचे बांधकाम करणा-या मजुरांच्या या झोपडया होत्या. रात्री हे मजूर गाढ झोपेत असताना शॉर्ट सर्किटमुळे या झोपडयांमध्ये आग भडकली. या आगीत जखमी झालेल्या चारजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हिमाचलप्रदेशमधून हे मजूर येथे आले होते. 

Web Title: In Kashmir, slums fire, 10 laborers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.