पाकच्या गोळीबारात जवान शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:13 AM2018-05-16T04:13:32+5:302018-05-16T04:13:32+5:30

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला.

Jupiter martyr in the firing of Pakistan | पाकच्या गोळीबारात जवान शहीद

पाकच्या गोळीबारात जवान शहीद

Next

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या राज्याच्या दौºयाच्या चार दिवस अगोदर ही घटना घडली आहे. याच ठिकाणी या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, पाक सैनिकांनी मंगुचक भागात चौक्यांवर सोमवारी रात्री अंदाधुंद गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देणाºया जवानांनी प्रभावीपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी एक तास गोळीबार सुरू होता. यात कॉन्स्टेबल देवेंद्र सिंह यांना गोळी लागली आणि ते शहीद झाले.
या ठिकाणी दोन्ही बाजूंनी थांबून-थांबून गोळीबार होत आहे. विशेष म्हणजे, २४ तासांपूर्वी बीएसएफने कठुआ जिल्ह्यात हिरानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाच व्यक्तींची संशयित हालचाल पाहिली होती.
ते अतिरेकी असावेत आणि
भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न
करीत आहेत, असा संशय आहे. त्यानंतर, व्यापक तपास मोहीम राबविण्यात आली, तर जम्मूत हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अधिकाºयांनी सांगितले की, या तपास मोहिमेत हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. ही मोहीम दुसºया दिवशीही सुरूच आहे. (वृत्तसंस्था)
-700वेळा गोळीबार
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबाराच्या सातशेहून अधिक घटना घडल्या असून, यात मृत्युमुखी पडणाºयांची संख्या ३३ झाली आहे. यात १७ सुरक्षारक्षक शहीद झाले आहेत. पंतप्रधान मोदी १९ रोजी जम्मू-काश्मिरात येत आहेत.

Web Title: Jupiter martyr in the firing of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.