जम्मू काश्मीर - जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 09:29 AM2018-03-01T09:29:40+5:302018-03-01T09:32:32+5:30

जम्मू काश्मिरमधील बंदिपोरा येथे हाजीन क्षेत्रात आज सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली

Jammu Kashmir - A militant killed in the encounter with the jawans | जम्मू काश्मीर - जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन सुरु 

जम्मू काश्मीर - जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन सुरु 

Next

श्रीनगर - जम्मू काश्मिरमधील बंदिपोरा येथे हाजीन क्षेत्रात आज सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी चकमक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शकरुद्दीन गावात सकाळपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं आहे. 

जवानांना काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फक्त सर्च ऑपरेशन होतं, पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि याचं चकमकीत रुपांतर झालं.



 

Web Title: Jammu Kashmir - A militant killed in the encounter with the jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.