Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:28 PM2019-07-04T13:28:28+5:302019-07-04T13:29:47+5:30

भाविकांच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान सज्ज

ITBP personnel braving shooting stones by placing Shield wall to ensure safe passage of Amarnath Yatris | Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

Next

श्रीनगर: अतिशय अवघड यात्रांपैकी एक मानली जाणारी अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट काढत भाविकांना मार्गक्रमण करावं लागतं. या काळात भारतीय जवान कायम भाविकांच्या मदतीला धावून जातात. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी छातीचा कोट करणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. डोंगरावरुन कोसळणाऱ्या दगडांपासून यात्रेकरुंचा बचाव करण्यासाठी आयटीबीपीचे जवान अगदी स्वत:ची ढाल करुन उभे असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यात्रेकरुंचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आयटीबीपीचे अथक प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आयटीबीपीकडून यात्रेकरुंना वैद्यकीय मदतदेखील दिली जात आहे. 




अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी जूनच्या अखेरच्या आठवड्यापासूनच तयारी सुरू केली. त्यासाठी पहलगाम, बालटाल मार्गावर मुक्काम ठोकला. दुर्गम पर्वतीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांपासून भाविकांचा बचाव करण्याची संपूर्ण यंत्रणा आयटीबीपीनं तयार ठेवली आहे. यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींमधून भाविकांची सुटका करण्यासाठी सज्ज असल्याचं आयटीबीपीकडून सांगण्यात आलं आहे. 

Web Title: ITBP personnel braving shooting stones by placing Shield wall to ensure safe passage of Amarnath Yatris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.