निवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिला

By admin | Published: August 11, 2016 10:14 AM2016-08-11T10:14:16+5:302016-08-11T10:14:16+5:30

मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं सांगतिलं आहे

Irom Sharmila will get married only after elections are defeated | निवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिला

निवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिला

Next
>ऑनलाइन लोकमत - 
इंफाळ, दि. 11 - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडले. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे इरॉम शर्मिला निवडणूक लढवणार असून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. उपोषण सोडताना आपली मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याची आणि लग्न करण्याची इच्छा इरॉम शर्मिला यांनी व्यक्त केली होती. पण जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरॉम शर्मिला यांनी सांगितलं आहे. 
 
मणिपुरातून सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट) मागे घेण्यात यावा, यासाठी बेमुदत उपोषण करणा-या इरॉम शर्मिला यांनी 9 ऑगस्टला उपोषण साडले आहे. २000 सालपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांनी आपण उपोषण मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. उपोषणाने प्रश्न सुटणे आजच्या स्थितीत अवघड आहे, असे लक्षात आल्यामुळे आपण हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते. 
 
(अखेर १६ वर्षापासूनचे उपोषण 'तिने' सोडले)
 
मणिपूरमध्ये लष्कर विशेष अधिकार कायद्याचा वापर करुन अत्याचार, अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप होता. मणीपूरची मुख्यमंत्री बनून मला जनतेची सेवा करायची आहे असे उपोषण सोडल्यानंतर इरॉमने सांगितले. मी मणीपूरची मुख्यमंत्री झाले तर, सर्वप्रथम मी लष्कराला विशेष अधिकार देणारा (AFSPA) कायदा रद्द करण्याचे काम करीन असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कुठल्याही प्रस्थापित पक्षाबरोबर आपण जाणार नाही असेही इरॉम यांनी स्पष्ट केले. 
 
माझ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उपोषण करण्याऐवजी मी आता निवडणूक लढवून हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करीन असे इरॉम शर्मिला यांनी सांगितले होते. इरॉम नोव्हेंबर २००० पासून उपोषणाला बसल्या होत्या. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर  एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. 
 

Web Title: Irom Sharmila will get married only after elections are defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.