१५ कोटी ईपीएफ खात्यांत व्याजच जमा झाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 06:21 AM2018-08-08T06:21:33+5:302018-08-08T06:21:51+5:30

भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही.

Interest did not accrue in 15 crores EPF accounts | १५ कोटी ईपीएफ खात्यांत व्याजच जमा झाले नाही

१५ कोटी ईपीएफ खात्यांत व्याजच जमा झाले नाही

Next

- संतोष ठाकूर 
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०१७-१८ या वर्षाची व्याजाची रक्कम गेल्या तीन महिन्यांपासून १५ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यात जमा केलेली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी महिनाभर तरी कर्मचाºयांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय रोजगार व श्रममंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की, उशिराच्या कारणांची माहिती घेतली जाईल. कर्मचाºयांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. त्यांना निर्धारित तारखेपासून व्याज मिळेल.
देशात सुमारे १७ कोटी ईपीएफओचे खातेधारक आहेत. त्यापैकी ५ कोटी खातेधारक सक्रिय आहेत. २० अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेली संस्था ईपीएफओच्या कक्षेत येते. २०१५-१६ मध्ये ९,२१,००० नोंदणीकृत कंपन्या ईपीएफओच्या कक्षेत होत्या. २०१६-१७ मध्ये ही संख्या १०.२ कोटी झाली.
सक्रिय खातेधारकांना नियमित वेतन मिळते, तसेच त्यांच्या ईपीएफओ खात्यावर नियमित रक्कमही जमा होते. मूळ
रकमेबरोबर प्रत्येक महिन्याला
व्याजही जमा होत असते. तथापि, या वर्षी मार्चनंतर व्याज जमा होणे थांबलेले आहे. ईपीएफओचा पैसा बाजारात लावण्याचे सूतोवाच सरकारने अलीकडेच केले होते. त्यामुळे आपला पैसा बुडाला तर नाही ना, असा संशय कर्मचाºयांत निर्माण झाला आहे.
>विलंबाची कारणे
आयुक्त दर्जाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यंदा जीएसटी आणि अन्य केंद्रीय कराबाबत काही समस्या होत्या. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून रक्कम मिळण्यास उशीर झाला आहे. व्याजदरात बदल झाल्यावर तांत्रिक व्यवस्था बदलावी लागते. नव्या कंपन्या ईपीएफओत दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठीही सॉफ्टेवअर अद्ययावत करावे लागत आहे. त्यामुळे उशीर झाला आहे.

Web Title: Interest did not accrue in 15 crores EPF accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.