Indian Navy: सरखेल, गोलंदाज, सागरवीर..., मोदींच्या घोषणेनंतर नौदलात अशी असतील पदांची नावं 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:16 PM2023-12-05T14:16:32+5:302023-12-05T14:17:25+5:30

Indian Navy: काल झालेल्या नौदल दिन सोहळ्याला उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदल आता आपल्या रँकची नावं भारतीय परंपरांच्या अनुरूप ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

Indian Navy: Sarkhel, Bowler, Sagarveer..., these will be the names of the posts in the Navy after Modi's announcement | Indian Navy: सरखेल, गोलंदाज, सागरवीर..., मोदींच्या घोषणेनंतर नौदलात अशी असतील पदांची नावं 

Indian Navy: सरखेल, गोलंदाज, सागरवीर..., मोदींच्या घोषणेनंतर नौदलात अशी असतील पदांची नावं 

यावर्षीचा नौदल दिन सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये साजरा झाला. यावेळी नौदलानं विविध प्रात्यक्षिकं दाखवत आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. दरम्यान, या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदल आता आपल्या रँकची नावं भारतीय परंपरांच्या अनुरूप ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही ब्रिटिश रँक्स बदलणार असून, त्याजागी भारतीय नावं ठेवणार असल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदींनीछत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वराज्याच्या नौदलातील कान्होजी आंग्रे, मायाजी नाइक भटकर आणि हिरोजी इंदूलकर यांनाही नमन केलं. 

मोदींनी केलेल्या घोषणेनंतर भारतीय नौदलाचे ज्युनियर आणि नॉन कमिशन्ड रँक्सची नावं आधी बदलली जाऊ शकतात. यामध्ये मास्टर चीफ पेटी ऑफिसर फर्स्ट क्लास, मास्टर चीफ पेटी ऑफिसर सेकंड क्लास, चीफ पेटी ऑफिसर, पेटी ऑफिसर, लिडिंग सीमॅन, सीमॅन फर्स्ट क्लास आणि सीमॅन सेकंड क्लास ही नावं बदलली जाऊ शकतात. त्याचा परिणाम नौदलाच्या ६५ हजार नौसैनिकांवर पडणार आहे. मात्र अधिकाऱ्यांची नावं सध्यातरी आहेत तशी ठेवली जाऊ शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा प्रकारची नावं बदलली जाणार याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र त्यासाठी दोन प्रकारचे ट्रेंड फॉलो केले जाऊ शकतात. पहिला म्हणजे अग्निवीर आणि वायूवीर याप्रमाणे जलवीर, समुद्रवीर किंवा सागरवीर अशी नावं दिली जाऊ शकतात. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमारामध्ये जी पदनामं होती त्यांच्या आधारावर भारतीय नौदलाची नावं बदलली जाऊ शकतात. 

मराठा आरमारामध्ये कुठल्या पदांना काय म्हणायचे त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे.
 
महा-नौसेनाध्यक्ष/Grand Admiral - सरखेल किंवा सरसुभेदार. हे पद १६९८ नंतर कान्होजी आंग्रे यांना देण्यात आलं होतं. मराठा आरमारातील सर्व पदनामं ही छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली होती. 
नौसेनाध्यक्ष/अॅडमिरल - सुभेदार 
सीनियर कॅप्टन-कोमोडोर - सरदार

कनिष्ठ स्तरावरील नौसैनिकांची तीन कॅडरमध्ये विभागणी करण्यात आली होती.
खलाशी - Sailors
शिपाई  - Soldiers
गोलंदाज - Gunners

सेरल रँक याप्रमाणे होते 
चीफ पेटी ऑफिसर - सरतांडेल, हा जहाजाचा कॅप्टन किंवा मास्टर होता.
पेटी ऑफिसर - तांडेल, हा जहाजाच्या क्रूचा लीडर होता.
नेव्हिगेटर - सारंग, हा तांडेल पदाच्या बरोबरीचा असे. 
 
मरीन रँकमध्ये दोन कॅडर
कार्पोरल - नाईक 
सोल्जर - शिपाई 
 मराठा नौदलामध्ये गनर म्हणजेच गोलंदाजाचं मूल्य सर्वाधिक होतं. कनिष्ठ रँक्समध्ये त्याला जहाजावर सर्वाधिक पगार मिळत असे. त्यावेळी सन १७८२-८३ च्या आर्थिक वर्षात खलाशाचा पगार ६१.५ रुपये प्रतिवर्ष होता. शिपायाचा पगार ६५ रुपये प्रतिवर्ष आणि गोलंदाजाचं वेतन ६७.८ रुपये प्रतिवर्ष होता.

Web Title: Indian Navy: Sarkhel, Bowler, Sagarveer..., these will be the names of the posts in the Navy after Modi's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.