आज भारत बंद! अॅट्रॉसिटी अॅक्टविरुद्ध सवर्ण संघटनांचे आंदोलन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:18 AM2018-09-06T09:18:47+5:302018-09-06T09:26:07+5:30

या बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

India is closed today! Against the Atrocities Act, the organization of the agitation started | आज भारत बंद! अॅट्रॉसिटी अॅक्टविरुद्ध सवर्ण संघटनांचे आंदोलन सुरू

आज भारत बंद! अॅट्रॉसिटी अॅक्टविरुद्ध सवर्ण संघटनांचे आंदोलन सुरू

नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये करण्यात येणाऱ्या संशोधनाविरुद्ध सवर्ण संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. सवर्ण समाज, करणी सेना, सपाक्स आणि इतर काही सवर्ण संघटनांनी आज हा बंद पुकारला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. देशातील अनेक राज्यात या बंदचा परिमाण दिसून येत आहे.

जाती आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देणे चुकीचे आहे, असे म्हणत सवर्ण संघटनांनी हे आंदोलन पुकारले असून बंदची मागणी करणाऱ्या संघटनांनी प्रमुख नेत्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

Update Live - 
बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात आंदोलक एकत्र आले आहेत. या आंदोलकांननी राष्ट्रीय महामार्ग 80 ला जाम केले आहे. 

मधुबनी येथेही आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 105 जाम केला आहे. तसेच लोकांनी मोदी सरकारविरुद्ध नारेबाजी सुरू केली आहे. 

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीजीपी मुख्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे बजावले आहे.

गौतमबुद्ध नगर येथील काही संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टमधील संशोधन हे राजकारण असल्याचेही या संघटनांनी म्हटले आहे. 

मध्य प्रदेशच्या मुरैना, भिंड आणि शिवपुरी जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.   

राजस्थानमधील अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. 

Web Title: India is closed today! Against the Atrocities Act, the organization of the agitation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.