‘आयुष्यमान भारत’च्या पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:52 AM2018-04-15T00:52:48+5:302018-04-15T00:52:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे शनिवारी येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.

 Inauguration of the first health center of 'Life in India' | ‘आयुष्यमान भारत’च्या पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

‘आयुष्यमान भारत’च्या पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

Next

जांगला (बिजापूर, छत्तीसगड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे शनिवारी येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी मे २०१५ मध्ये त्यांनी दंतेवाडाला भेट दिली होती.
सात गावांतील बँक शाखांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. इंडिया बीपीओ प्रोत्साहन योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ग्रामीण बीपीओ
केंद्राला त्यांनी भेट दिली. या
बीपीओ केंद्राला बस्तर
इंटरनेट योजनेच्या माध्यमातून
इंटरनेट सेवा पुरविण्यात येत
आहे. (वृत्तसंस्था)

अन्य कामांचीही सुरुवात
बस्तर इंटरनेट योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मोदी त्यांच्या हस्ते झाले. त्याद्वारे आदिवासीबहुल सात जिल्ह्यांत ४० हजार किमी फायबर आॅप्टिकल केबल टाकून इंटरनेट जाळे निर्माण करण्यात येणार आहे. बिजापूर, नारायणपूर, बस्तर, कांकेर, कोंडगाव, सुकमा आणि दंतेवाडा यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी रेल्वे मार्ग आणि गुडुम व भानुप्रतापपूर या दरम्यान धावणाºया रेल्वेचे उद्घाटनही केले. यामुळे बस्तर विभाग रेल्वेच्या नकाशावर आला आहे.

Web Title:  Inauguration of the first health center of 'Life in India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.