शशिकला यांना मिळणाऱ्या VVIP सुविधांचे पुरावे आहेत- डी रूपा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 01:09 PM2017-07-26T13:09:31+5:302017-07-26T13:12:18+5:30

I have evidence about sasikala enjoying facility in jail | शशिकला यांना मिळणाऱ्या VVIP सुविधांचे पुरावे आहेत- डी रूपा

शशिकला यांना मिळणाऱ्या VVIP सुविधांचे पुरावे आहेत- डी रूपा

Next
ठळक मुद्देशशिकला यांना मिळणाऱ्या VVIP सुविधांचे पुरावे आहेत- डी रूपामी माझं काम केलं आहे. याआधीही अनेक वेळा माझी बदल झाली आहेशशिकला यांना तुरूंगात देण्यात येत असलेली व्हीव्हीआयपी वागणुक सांगणारे सगळे पुरावे खरे असून ते सत्यतेवर आधारीत आहेत.

चेन्नई, दि. 26- बेहिशेबी संपत्तीप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बंगुळुरू तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं तुरूंग उपमहानिरीक्षक डी रूपा यांनी उघडकीस आणलं होतं. तसंच तुरुंग उपमहानिरीक्षक डी रूपा यांनी या बेकायदेशीर गोष्टी करायला तुरुंगातील अधिकारीच परवानगी देत असल्याचा आरोपही केला होता. शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचं उघड केल्यानंतर डी रूपा यांचा बदली करण्यात आली होती. याप्रकरणी आता डी रूपा यांनी महत्त्वाची माहिती उघड केली आहे. शशिकला यांना तुरूंगात व्हीव्हीआयपी वागणुक मिळत असल्याचं मी पाहिलं आहे आणि यासंदर्भातील सबळ पुरावे माझ्याकडे असल्याचं डी रूपा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे. 

मी माझं काम केलं आहे. याआधीही अनेक वेळा माझी बदल झाली आहे. माझ्या 17 वर्षाच्या सेवेतील ही 26वी बदली आहे. माझी पोस्टिंग एखाद्या ठिकाणी व्हावी यासाठी मी कोणासमोरही कधी झुकत नाही. सगळ्या राजकीय पक्षांमध्ये समतोल आहे, असं डी रूपा यांनी सांगितलं आहे. तसंच शशिकला यांना तुरूंगात देण्यात येत असलेली व्हीव्हीआयपी वागणुक सांगणारे सगळे पुरावे खरे असून ते सत्यतेवर आधारीत आहेत. शशिकला यांना मिळणारी वागणुक आणि इतर कैदांना मिळणारी वागणुक यांच्यातील फरक मी पाहिला असल्याचं डी रूपा म्हणाल्या आहेत. तुरूंगाच्या एका भागातील अख्खं कॉरीडोअर शशिकला यांच्यासाठी ठेवण्यात आलं होतं. तेथे पाच खोल्या आहेत, त्या पाचही खोल्या शशिकला यांच्यासाठीच खुल्या ठेवण्यात आल्या. पाच खोल्यांमध्ये शशिकला यांचं सामान पसरवून ठेवलं होतं. तसंच एका खोलीत त्यांच्यासाठी पलंगची आणि एलईडी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच त्यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली. या सगळ्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं डी रूपा मुलाखतीत म्हणाल्या आहेत. शशिकला इतर कैद्यांप्रमाणेच एक कैदी आहेत त्यामुळे त्यांना व्हीव्हीआयपी वागणुक न देता इतरांप्रमाणेच वागणुक द्यायला हवी. शशिकला या 'क्लास वन' किंवा 'क्लास ए'च्या कैदी आहेत, असं सांगणारा कोणताही आदेश नाही. त्यामुळे वेगळी वागणुक बेकायदेशीच आहे, असं डी रूपा यांनी सांगितलं आहे. 

डी रुपा यांनी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहून शशिकलांना मिळत असलेल्या व्हीव्हीआयपी वागणुकीबद्दल खुलासा केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेप घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचं डी रुपा यांनी पत्रातून सांगितलं होतं.कारागृहात नियमांचं होणारं उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचंही बोललं जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणा-यांना शिक्षा करावी", अशी विनंती रुपा यांनी पत्रातून केली. याशिवाय रुपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले. 10 जुलै रोजी कारागृहातील 25 जणांची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. यावेळी 18 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. रुपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली.

शशिकला यांच्या समर्थकांनी डी रूपा यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची धमकी दिली होती. यावर रूपा म्हणाल्या, मी माझं काम केलं आहे. कोणताही बदनामीचा खटला दाखल झालेला नाही. 
 

Web Title: I have evidence about sasikala enjoying facility in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.