हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दिल्ली उच्च न्यायालयाचे आत्मसमर्पण करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:20 PM2017-09-26T20:20:44+5:302017-09-26T20:30:21+5:30

हनीप्रीतने वकिलांमार्फत दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायालयानं हनीप्रीतला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

Honeypreet's anticipatory bail was rejected, Delhi High Court surrenders orders | हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दिल्ली उच्च न्यायालयाचे आत्मसमर्पण करण्याचे आदेश

हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळला, दिल्ली उच्च न्यायालयाचे आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Next

नवी दिल्ली, दि. 26 - बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या राम रहीमची मानस कन्या हनीप्रीतचा पोलिसांकडून देशभर शोध घेतला जातोय. राम रहीम याच्या अटकेनंतर गायब झालेली हनीप्रीत नेपाळमध्ये लपल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, त्यावेळी अलर्टही जारी करण्यात आला होता. त्यानंतर हनीप्रीत दिल्लीत असल्याची माहिती उघड झाली होती. हनीप्रीतने वकिलांमार्फत दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायालयानं हनीप्रीतला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सेहगल यांनी हनीप्रीतचा जामीन फेटाळत शरण येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आत्मसमर्पण करणं हाच तिच्यासमोर एकमेव सोपा मार्ग असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
  
हनीप्रीतचे वकील प्रदीप कुमार आर्य यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर तीन आठवड्यांसाठी हनीप्रीतला ट्रांजिट बेल मिळवण्याची मागणी केली होती. मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी हनीप्रीत कुठे असल्याची वकिलांकडे विचारणा केली होती. त्याचं उत्तर देताना हनीप्रीतच्या जिवाला धोका असल्याचं तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं होतं. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतच्या जिवाला धोका असल्याची शक्यता वर्तविली आहे. हनीप्रीतकडून दाखल झालेल्या याचिकेत तिच्या जिवाला पंजाब आणि हरियाणातील ड्रग्ज माफियांकडून धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मी एक साफ आणि साधं आयुष्य जगणारी महिला असल्याचं हनीप्रीतने याचिकेत म्हटलं आहे. मी कायद्याचं पालन करणारी असून पोलीस तपासाला सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं याचिकेत नमूद असल्याचं समजतं आहे. या याचिकेवर दुपारी दोन वाजता सुनावणी केली जाणार असल्याचं मुख्य न्यायमुर्तींनी सांगितलं आहे. याच दरम्यान हरियाणा पोलिसांनी अरेस्ट वॉरंटसह दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधील एका घरावर छापा मारला पण तिथे हनीप्रीत सापडली नाही. 

राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 25 ऑगस्टपासून हनीप्रीत फरार आहे. कोर्टात तिने हनीप्रीत तनेजी नावाने याचिका दाखल केली आहे. हनीप्रीत सतत माझ्या संपर्कात आहे. तिला योग्य निर्णय घ्यायला वेळ लागला. तिने माझ्याशी संपर्क केल्यावर आम्ही लगेचच महत्त्वाची पाऊलं उचलली असल्याचं हनीप्रीतच्या वकिलांनी सांगितलं. याचिकेच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी हनीप्रीत सोमवारी दुपारी दिल्लीतील लाजपत नगरमधील माझ्या ऑफिसला आली होती, असंही त्यांनी सांगितलं. हनीप्रीत आता कुठे आहे ? अशी विचारणा कोर्टाने केल्यावर त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती नसल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. 

Web Title: Honeypreet's anticipatory bail was rejected, Delhi High Court surrenders orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.