...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:27 AM2024-02-05T09:27:25+5:302024-02-05T09:27:43+5:30

तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

...hence the dearth of jobs in the country; Congress criticizes the central government | ...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

...म्हणूनच देशात नोकऱ्यांचा दुष्काळ; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले की, भारतातील बेरोजगारीबाबत केलेल्या एका नव्या विश्लेषणात सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रोजगाराचे संकट समोर आले आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक असलेल्या जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी हे विश्लेषण केले असल्याचे रमेश यांनी सांगितले.

काँग्रेसचा आरोप
३० वर्षांहून अधिक काळात प्रथमच पगार मिळणाऱ्या कामगारांचा वाटा कमी झाला आहे.
५% कमाई ग्रामीण मजुरांची कमी झाली आहे.
२० टॉप कंपन्या ९० टक्के नफा कमावत आहेत, तर भारतातील इतर लाखो कंपन्यांचा नफा केवळ १० टक्के आहे.
२०१४ मध्ये टॉप २० कंपन्यांचा नफा केवळ ४० टक्के होता.
२०१९ मध्ये कॉर्पोरेट करात २५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने दरवर्षी १ लाख कोटींचे नुकसान होत आहे.

आम्ही तरुणांच्या शिक्षण आणि रोजगारासाठी काम करतो. आर्थिक असमतोल, नोटाबंदी, जीएसटी आणि बेरोजगारी यांनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

Web Title: ...hence the dearth of jobs in the country; Congress criticizes the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.