मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:32 AM2018-08-13T11:32:21+5:302018-08-13T11:33:08+5:30

देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

Heavy rains flood floods in many states, 774 deaths in 7 states | मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसानं अनेक राज्यांत पूरस्थिती, 7 राज्यांत 774 जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली- देशाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांतील जनजीवन विस्कळीत झालंय. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानुसार, सात राज्यांत मुसळधार पावसानं आतापर्यंत 774 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडलेली आहे. त्याच दरम्यान हवामान खात्यानं उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसमवेत 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्रा(एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसानं केरळ राज्यात 187, उत्तर प्रदेश 171, पश्चिम बंगाल 170 आणि महाराष्ट्रात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर गुजरातमध्ये 52, आसाममध्ये 45, नागालँडमध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22 आणि पश्चिम बंगालमध्ये पाच लोक बेपत्ता आहेत. सात राज्यांमध्ये मुसळधार पावसानं 245 लोक जखमी झाले आहेत.
केरळमध्ये 8 हजार कोटींहून अधिक नुकसान
केरळमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे मृतांची संख्या 39च्या वर गेली आहे. इदुक्कीमध्ये 20.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पावसानं राज्यात 8 हजार कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात केरळमध्ये अशा प्रकारे कधीही पूरस्थिती उद्भवलेली नव्हती. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मते, आतापर्यंत 8316 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. तर 10 हजारहून अधिक किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत.

Web Title: Heavy rains flood floods in many states, 774 deaths in 7 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.