रणरणत्या उन्हातही अण्णांना हजारोंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:58 PM2018-03-23T23:58:09+5:302018-03-23T23:58:09+5:30

प्रख्यात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांचे १७ वे उपोषण सुरू झाले आहे. ‘अनिश्चितकालिन सत्याग्रह’ असा घोषणा फलक उपोषणाच्या व्यासपीठावर आहे. ‘सशक्त लोकपाल’, ‘सक्षम किसान’ व ‘निष्पक्ष चुनाव’ या मागण्यासांठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक येत आहेत.

Hazare support thousands of times in the sunny days | रणरणत्या उन्हातही अण्णांना हजारोंचा पाठिंबा

रणरणत्या उन्हातही अण्णांना हजारोंचा पाठिंबा

googlenewsNext

नवी दिल्ली : प्रख्यात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांचे १७ वे उपोषण सुरू झाले आहे. ‘अनिश्चितकालिन सत्याग्रह’ असा घोषणा फलक उपोषणाच्या व्यासपीठावर आहे. ‘सशक्त लोकपाल’, ‘सक्षम किसान’ व ‘निष्पक्ष चुनाव’ या मागण्यासांठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक येत आहेत.
मैदानातील मोठ्या व्यासपीठावर अण्णा हजारे, कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे व हरयाणाचे निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल आहेत. खालील व्यासपीठावर क्रांतीगीते, देशभक्तीपर गीते गाणारे कार्यकर्ते, घोषणा देणारे युवक कार्यकर्ते आहेत. दोन्ही व्यासपीठांपलीकडच्या मंडपात देशभरातील सामाजिक
कार्यकर्ते आणि २०१२च्या आंदोलनातील सहभागी झालेले
लोक आहेत.
व्यासपीठाच्या उजव्या व डाव्या बाजूला पोलिसांचा वेढा आहे. प्रत्येकाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. सर्व
परिसर पोलिसांनी फुलून गेला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे.
आंदोलनाच्या पहिल्या
दिवशीच वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या आंदोलकांमुळे व्यासपीठासमोरील मंडप भरून गेला होता. तिरंगा घेतलेले काही कार्यकर्ते होते. उन्हातही उत्साही
स्त्री-पुरुष कार्यकर्ते मंडपात शांतपणे बसून होते. ‘आंदोलन’असे लिहिलेल्या टोप्या त्यांनी परिधान केल्या होत्या.

लोकपालची सरकारला भीती

आंदोलकांच्या बसगाड्या पोलिसांनी ठिकठिकाणी रोखल्याचा आरोप अण्णांसह संतोष हेगडे, प्रीतम पाल, शिवकुमार कक्का यांनी केला. प्रीतमपाल यांनी अण्णांचा उल्लेख ‘भारतवर्ष के सबसे बडे समाजसेवक’ असा केला.
संतोष हेगडे म्हणाले की, १९६४ पासून लोकायुक्त व लोकपाल या संस्था सशक्त करण्यासाठी मागणी केली जात आहे. २०१२ मध्ये अण्णांनी आंदोलन करूनही लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी केली गेली नाही, कारण सरकारला लोकपाल संस्थेची भीती आहे.

कार्यकर्त्यांनीच केली पाण्याची व्यवस्था :
रामलीला मैदानामध्ये पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे अण्णांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगत उन्हाचा त्रास होत असला तरी तो सहन करा, असे आवाहन केले. त्यामुळे तहानलेल्या मंडळींना पाण्याच्या प्रतीक्षेतच राहावे लागले.

Web Title: Hazare support thousands of times in the sunny days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.