गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, कॉंग्रेसचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 12:12 PM2017-10-15T12:12:12+5:302017-10-15T13:04:46+5:30

पंजाबमधील  गुरदासपूर लोकसभा  पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.  कॉंग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपाच्या स्वर्णसिंह सलारिया यांच्यावर तब्बल  1 लाख 93 हजार 219 मतांनी विजय मिळवला. 

Gurdaspur bypoll in BJP by-election, Congress 2 lakh votes lead | गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, कॉंग्रेसचा दणदणीत विजय

गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, कॉंग्रेसचा दणदणीत विजय

Next

गुरदासपूर: पंजाबमधील  गुरदासपूर लोकसभा  पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.  कॉंग्रेसचे सुनील जाखड यांनी भाजपाच्या स्वर्णसिंह सलारिया यांच्यावर तब्बल  1 लाख 93 हजार 219 मतांनी विजय मिळवला आहे.  विनोद खन्ना यांचं एप्रिलमध्ये निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. 

भाजपाने स्वर्णसिंह सलारिया आणि आम आदमी पक्षाने मेजर जनरल (निवृत्त) सुरेश खजूरिया यांना जाखड यांना रिंगणात उतरवले होते. या जागेसाठी 11 ऑक्टोबररोजी मतदान झाले. सुमारे 56 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जाखड हे पंजाब काँग्रेसचे प्रमुख असून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. 



नवजोत सिंग सिद्धू यांनी हा विजय म्हणजे पक्षाचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांना दिवाळी गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. तर सुनील जाखड यांनी हा निकाल म्हणजे केंद्र सरकारच्या निती विरोधोतील संताप असल्याचं म्हटलं आहे.

11 ऑक्टोबररोजी केरळमध्ये वेंगारा विधानसभा मतदारसंघातही  पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. यामध्येही भाजपाप्रणित एनडीएला सपशेल हार पत्कारावी लागली असून त्यांचा उमेदवार चौथ्या स्थानावर राहीला तर  ‘यूडीएफ’चे केएनए खाडेर विजयी झाले. 

Web Title: Gurdaspur bypoll in BJP by-election, Congress 2 lakh votes lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.