गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 09:55 AM2017-12-18T09:55:38+5:302017-12-18T09:58:32+5:30

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

Gujarat-Himachal assembly results, know important things | गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

गुजरात-हिमाचल विधानसभा निकाल, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Next
ठळक मुद्देगुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपा गुजरातमध्ये सहाव्यांदा सरकार स्थापन करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

अहमदाबाद/शिमला- गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपा गुजरातमध्ये सहाव्यांदा सरकार स्थापन करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर दुसरीकडे 22 वर्ष विरोधी पक्षात राहिल्यानंतर काँग्रेसला संधी मिळण्याची प्रतिक्षा आहे. हिमाचल प्रदेशात सत्तारूढ काँग्रेस आणि भाजपा विजयाचा दावा करतं आहे. 

जाणून घ्या निवडणुकीशा संबंधित काही प्रमुख गोष्टी

-  गुजरातमध्ये 37 जिल्ह्यात 37 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.

- गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. दोन्ही टप्प्यात एकुण 68.41 टक्के मतदान पार पडलं. 

- 4.35 कोटी मतदारांपैकी जवळपास 2.97 कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

- हिमाचल प्रदेशात 68 विधानसभेच्या जागेसाठी 337 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. 

- हिमाचल प्रदेशात 9 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात जवळपास 75.28 टक्के मतदान झालं. राज्यात आत्तापर्यंत सर्वात जास्त मतदान यावेळी झालं आहे. 

- हिमाचलमध्ये 42 केंद्रांवर 781 टेबल्सवर मतमोजणी सुरू आहे. तेथे जवळपास 2 हजार 820 ऑफिसर तैनात आहे. यामध्ये 940 सुपरवायजर आणि 940 काऊंटिंग सहाय्यकांसह माइक्रो ऑब्जर्वरचा सहभाग आहेत. 

- प्रत्येक मतदार संघाच्या पोलिंग स्टेशनला व्हीव्हीपॅट स्लिपच्या मोजणीसाठी नियुक्त केली जाईल. 

Web Title: Gujarat-Himachal assembly results, know important things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.