जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण; देशात वाढणार इंटरनेटचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:17 AM2018-12-06T05:17:51+5:302018-12-06T05:17:58+5:30

देशातील सर्वात अवजड उपग्रह जीसॅट-११ चे मंगळवारी मध्यरात्रीनंतर यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

 GSAT-11 launch of satellite; Internet speed will increase in the country | जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण; देशात वाढणार इंटरनेटचा वेग

जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण; देशात वाढणार इंटरनेटचा वेग

Next

बंगळुरू : देशातील सर्वात अवजड उपग्रह जीसॅट-११ चे मंगळवारी मध्यरात्रीनंतर यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ५,८५४ किलो वजनाचा हा उपग्रह युरोपिअन अवकाश केंद्र गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आला. दूरसंचारामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या या उपग्रहामुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढू शकणार आहे. एका मोठ्या खोलीच्या आकारचा हा उपग्रह आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला जीसॅट-११ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, जीसॅट-६ ए अयशस्वी ठरल्यानंतर अनेक तपासण्या केल्यानंतर जीसॅट-११ या उपग्रहाचे गुएना येथून प्रक्षेपण करण्याचा निर्णय झाला. या उपग्रहामुळे दर सेकंदाला १00 गीगाबाईटपेक्षा अधिक कनेक्टिव्हिटी मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे. ही दूरसंचारातील क्रांती ठरू शकेल. 

Web Title:  GSAT-11 launch of satellite; Internet speed will increase in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.