२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:52 AM2024-05-06T05:52:05+5:302024-05-06T05:52:29+5:30

‘किन्नेरा’ दुर्मीळ वाद्याला दिली होती नवी ओळख

Got Padma Shri 2 years ago, now have to do wages darshanam mogilaiah story | २ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी

२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘किन्नेरा’ या दुर्मीळ वाद्याला पुनरुज्जीवन दिल्याचा सन्मान म्हणून दोन वर्षांपूर्वी दर्शनम मोगुलैया (७३) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर मजुरी करण्याची वेळ आली आहे. ते हैदराबादच्या तुर्कयमजलमध्ये मजूर म्हणून काम आहेत. 

तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोगुलैया यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर ते चर्चेत आले होते. राज्यातही त्यांना मोठा सन्मान मिळाला. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांच्यापासून मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याच्यासोबतचे बरेच फोटो काढले अन् नंतर विसरून गेले.

एकामागून एक अशा अनेक अडचणींमुळे त्यांना तेलंगणा सरकारकडून मिळालेली एक कोटी रुपयांची रोख रक्कम कौटुंबीक गरजांसाठी खर्च झाली. ९ मुलांचे वडील असलेले मोगुलैया म्हणाले की, मला औषधांसाठी महिन्याला किमान ७ हजार रुपये खर्च येतो. याशिवाय नियमित वैद्यकीय चाचण्या आणि इतर खर्च आहेत. राज्य सरकारने त्यांना भूखंड जाहीर केला होता. त्याचे वाटप दोन वर्षांनंतरही झालेले नाही.

सर्वजण मदतीला होकार देतात अन् ...
nराज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले १० हजार रुपये मासिक मानधन नुकतेच बंद झाले त्यामुळे परिस्थिती आणखीणच कठीण झाल्याचे मोगुलैया यांनी सांगितले. 
nमी मदत मागण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारत असून, लोकप्रतिनिधींना भेटून मदत घेत आहे. 
nसर्वजण होकार देत आहेत. मात्र, कोणीही मदत न केल्याचे त्यांनी सांगितले.

... मजूर म्हणून करावे लागतेय काम
nत्यांच्या तीन मुलांचा आजाराने मृत्यू झाला. तिघे विवाहित आहेत, इतर तिघे अजूनही विद्यार्थी आहेत. मोगुलैया यांनी सांगितले की, मी कामासाठी अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 
nलोकांनी मला सहानुभूती दाखवली आणि थोडेफार पैसेही दिले. पण, मला रोजगार मिळाला नाही. शेवटी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला मजूर म्हणून काम करावे लागले.

Web Title: Got Padma Shri 2 years ago, now have to do wages darshanam mogilaiah story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.