'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:28 PM2018-12-03T19:28:05+5:302018-12-03T19:29:10+5:30

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे.

The glory of 'Ram' Naam! Ram in the name of 319 candidates in Rajasthan Assembly Election | 'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम

'राम'नामाचा महिमा! राजस्थानमधील निवडणुकीत तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम

Next
ठळक मुद्देअयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यापासून राजकीय वर्तुळात राम नामाचा जप सुरू झाला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे. 7 डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांपैकी तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम असल्याचे समोर आले आहे. 

जयपूर - नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले होते. मात्र भारतीय राजकारणात 'राम'नामाचा लाभ राजकारण्यांनी बऱ्यापैकी उचलला आहे. आता अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यापासून राजकीय वर्तुळात राम नामाचा जप सुरू झाला आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांमध्येही राम नामाची चलती असल्याचे समोर आले आहे.  7 डिसेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांपैकी तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम असल्याचे समोर आले आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात जरी राज्याच्या विकासाच्या मुद्य्यावरून झाली असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राम आणि हिंदुत्व हेच विषय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भाषणामध्ये प्रामुख्याने दिसत आहेत. दरम्यान राज्यातील 200 विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वपक्षीय आणि अपक्ष उमेदवारांची गोळाबेरीज केली असता तब्बल 319 उमेदवारांच्या नावात राम हे नाम आहे. नेहमी रामनामाचा जप करणाऱ्या भाजपाने नावात राम असलेल्या उमेदवारांमध्येही बाजी मारली आहे. भाजपाच्या एकूण उमेदवारांपैकी 30 उमेदवारांच्या नावात राम आहे. तर काँग्रेसच्या 23 उमेदवारांच्या नावात राम आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षानेही राम नाव असलेल्या 27 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर 107 अपक्ष उमेदवारांच्या नावातही राम आहे. 
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 11 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.   
 

Web Title: The glory of 'Ram' Naam! Ram in the name of 319 candidates in Rajasthan Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.