धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

By admin | Published: June 21, 2017 01:36 AM2017-06-21T01:36:04+5:302017-06-21T01:36:04+5:30

येथून अपहरण करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महिलेला मंगळवारी पहाटे ग्रेटर नोएडात कारमधून फेकण्यात आले

Gang rape in a moving car | धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

Next

गुडगाव : येथून अपहरण करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महिलेला मंगळवारी पहाटे ग्रेटर नोएडात कारमधून फेकण्यात आले. ही कार नंतर राजधानीच्या परिसरात (एनसीआर) फिरत राहिली आणि कारमधील तीन लोकांनी महिलेवर कथितरीत्या आळीपाळीने अनेक तास सामूहिक बलात्कार केला. महिनाभरापूर्वीच आयएमटी मानेसर येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांना हादरवून सोडले होते.
पीडित महिलेला ग्रेटर नोएडातील ‘चाचा का धाबा’च्या समोर सकाळी चार वाजता फेकण्यात आले. या महिलेचे गुडगावच्या सोहना भागातून अपहरण करण्यात आले होते. ते ठिकाण येथून भरपूर दूर आहे. या महिलेचे सोहना भागातून काल रात्री आठ वाजून ४५ मिनिटांनी अपहरण करण्यात आले होते आणि अनेक तासांनंतर स्विफ्ट कारमधून आज सकाळी तिला रस्त्यावर फेकण्यात आले. पीडित महिलेने स्थानिक लोकांना तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. लोकांनी गौतम बुद्धनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी बीअरच्या काही बाटल्याही आढळून आल्या आहेत. त्यावरून असे दिसते की, आरोपी मद्यधुंद होते. आम्ही या महिलेचा जबाब नोंदवून घेत आहोत, असे ग्रेटर नोएडाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ही महिला मूळची राजस्थानातील भरतपूरची रहिवासी आहे. सोमवारी रात्री सोहनाजवळील आपल्या नातेवाईकांच्या घराजवळ फेरफटका मारत असताना काही लोकांनी मला कारमध्ये ओढले. ते लोक तिचा विनयभंग करू लागले आणि नंतर चार ते पाच तास त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
दिल्लीहून हे लोक ग्रेटर नोएडा येथे गेले. तेथे अंधार असलेली जागा पाहून त्यांनी महिलेला कारमधून बाहेर फेकले आणि फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी या महिलेला दिली.

Web Title: Gang rape in a moving car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.