गांधी आडनावामुळेच कमी वयात खासदार झालो - वरुण गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:35 PM2017-12-17T15:35:12+5:302017-12-17T15:35:26+5:30

'गांधी' आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं.

Gandhi became an MP short lived due to his nomination - Varun Gandhi | गांधी आडनावामुळेच कमी वयात खासदार झालो - वरुण गांधी

गांधी आडनावामुळेच कमी वयात खासदार झालो - वरुण गांधी

Next

हैदराबाद : 'गांधी' आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत झाल्याचं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं. तसंच गॉडफादरशिवाय राजकारणात पाय रोवणं कठीण असल्याचंही वरुण गांधी म्हणाले.वरुण गांधी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते भाजपचे खासदार आहेत. हैदराबादेतील एका कार्यशाळेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी आज हैदराबादमध्ये आलो आणि तुम्ही मला ऐकता आहात. मात्र जर माझ्या नावापुढे गांधी आडनाव नसतं आणि मी दोनवेळा खासदार नसतो तर तुम्ही मला ऐकायला आला नसता, असंही वरुण गांधी पुढे म्हणाले.दरम्यान आज तरुणांना राजकारणात यायचं आहे, पण गॉडफादर नसल्यामुळे ते राजकारणापासून दूर राहात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Gandhi became an MP short lived due to his nomination - Varun Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.