‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासी पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 01:24 PM2018-10-05T13:24:28+5:302018-10-05T13:47:09+5:30

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Former TV anchor Suhaib Ilyasi acquitted in wife’s murder case | ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासी पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषमुक्त

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासी पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषमुक्त

Next

नवी दिल्ली - ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या क्राईम शोचा निवेदक सुहैब इलियासीला दिल्लीउच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या इलियासीला उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. 



सुहैब इलियासीवर 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 रोजी त्याची पत्नी अंजूची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी इलियासीवरविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. इलियासीचे गैरव्यवहाराची अंजूला पूर्ण कल्पना होती. किंबहुना त्याने ही सर्व चुकीची कामं थांबवावीत अशी तिची इच्छा होती. यातूनच त्याने ही हत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता.

डिसेंबर 2017 रोजी याप्रकरणी सुहैबला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला सुहैबने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर शुक्रवारी (5 ऑक्टोबर) न्यायालयाने निर्णय देत या सुहैबला प्रकरणातून दोषमुक्त केले आहे.

 
 

Web Title: Former TV anchor Suhaib Ilyasi acquitted in wife’s murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.