अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 07:06 PM2024-03-05T19:06:49+5:302024-03-05T19:14:58+5:30

Dhananjay Singh : बुधवारी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. सध्या धनंजय सिंह यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.     

Former MP Dhananjay Singh Convicted In Kidnapping Case, Quantum of Sentence on March 6 | अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका

अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह दोषी, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका

जौनपूर : अपहरण आणि खंडणी प्रकरणी माजी खासदार धनंजय सिंह आणि त्यांचा सहकारी संतोष विक्रम यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश शरद त्रिपाठी यांनी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांना दोषी ठरवले. दरम्यान, बुधवारी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. सध्या धनंजय सिंह यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.     

मुझफ्फरनगरचे रहिवासी नमामी गंगेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी १० मे २०२० रोजी लाइन बाजार पोलिस ठाण्यात धनंजय सिंह आणि त्यांचा साथीदार संतोष विक्रम यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. संतोष विक्रम याने दोन साथीदारांसह फिर्यादीचे अपहरण करून माजी खासदार धनंजय सिंह यांच्या निवासस्थानी नेले. 

यानंतर धनंजय सिंह यांनी पिस्तुलचा धाक दाखवून शिवीगाळ केली आणि फिर्यादीवर हलक्या दर्जाचे साहित्य पुरवण्यासाठी दबाव टाकला. तसेच, फिर्यादीने नकार दिल्याने धनंजय सिंह यांनी त्याला धमकावून खंडणी मागितली. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी धनंजय सिंह यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आज न्यायालयाने धनंजय सिंह यांना दोषी ठरवून तुरुंगात रवानगी केली.

दरम्यान, धनंजय सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही सुरु केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे याची पुष्टी केली. भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर धनंजय सिंह यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. कारण, भाजपाने जौनपूर लोकसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर धनंजय सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:चे एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "मित्रांनो! तयार राहा... लक्ष्य फक्त एक लोकसभा ७३, जौनपूर आहे. यासोबतच त्यांनी 'जीतेगा जौनपूर-जीतेंगे हम' अशा मजकुरासह आपला फोटोही शेअर केला होता. 

२७ व्या वर्षी पहिल्यांदा बनले आमदार
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी धनंजय सिंह यांनी २००२ ची विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. यामध्ये विजय मिळवून विधानसभेत पोहोचलेले धनंजय सिंह २००७ मध्ये जनता दल युनायटेड (JDU) च्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. २००९ ची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली. संसदेत जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. धनंजय सिंह यांनी २०२२ च्या यूपी निवडणुकीत जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली आहे.

Web Title: Former MP Dhananjay Singh Convicted In Kidnapping Case, Quantum of Sentence on March 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.