जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती, दुरुस्तीच्या कामांसाठी करारनामे पाच आवारभिंती; २१ शाळांच्या दुरुस्ती कामांचा समावेश

By admin | Published: February 20, 2016 12:34 AM2016-02-20T00:34:37+5:302016-02-20T00:34:37+5:30

अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती व इमारत विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच शाळांच्या आवारभिंती आणि २१ शाळा इमारतींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

Five memorials for the work of reconstruction of the Zilla Parishad schools; Including 21 School Repair works | जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती, दुरुस्तीच्या कामांसाठी करारनामे पाच आवारभिंती; २१ शाळांच्या दुरुस्ती कामांचा समावेश

जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती, दुरुस्तीच्या कामांसाठी करारनामे पाच आवारभिंती; २१ शाळांच्या दुरुस्ती कामांचा समावेश

Next
ोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या आवारभिंती व इमारत विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच शाळांच्या आवारभिंती आणि २१ शाळा इमारतींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २१ शाळांच्या इमारतींची विशेष दुरुस्ती आणि जांब, पास्टूल, गोंधळवाडी, बोडखा व हातगाव या पाच गावांतील शाळांच्या आवारभिंत कामांसाठी प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)अंबादास मानकर यांच्यामार्फत ५ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत बांधकाम विभागाला निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या आवारभिंती व इमारत विशेष दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत संबंधित ग्रामपंचायतींसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागामार्फत शाळांची संबंधित कामे सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: Five memorials for the work of reconstruction of the Zilla Parishad schools; Including 21 School Repair works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.