RSS अन् शिया धर्मगुरुंच्या बदनामी प्रकरणात आझम खान यांच्याविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 12:11 PM2019-02-02T12:11:44+5:302019-02-02T12:18:36+5:30

समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

FIR filed against Azam Khan in case of defamation of Shia religious leaders | RSS अन् शिया धर्मगुरुंच्या बदनामी प्रकरणात आझम खान यांच्याविरोधात FIR दाखल

RSS अन् शिया धर्मगुरुंच्या बदनामी प्रकरणात आझम खान यांच्याविरोधात FIR दाखल

Next
ठळक मुद्देसमाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लखनऊमधल्या हजरतगंज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आझम खान यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शिया धर्म गुरुंविरोधात वादग्रस्त विधान करणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.

लखनऊः समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लखनऊमधल्या हजरतगंज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आझम खान यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शिया धर्म गुरुंविरोधात वादग्रस्त विधान करणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. अल्लामा जमीन नक्वी यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लामा जमीन नक्वींनी पोलिसांत केलेल्या FIR द्वारे आझम खान यांच्यावर कलम 500 आणि 505अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चार वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकाळातील हे प्रकरण आहे. आझम खान यांनी 4 ऑगस्ट 2014 ते 12 ऑगस्ट 2014पर्यंत मौलाना जवात यांच्यावर चुकीचे आरोप लावत एक पत्रक प्रसिद्धीत दिलं होतं.


त्या पत्रकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही बदनामी करण्यात आली होती. तसेच त्यासंबंधीच्या बातम्या हा प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. तसेच आझम खान यांनी लावलेल्या आरोपांचे ते पुरावे देऊ शकलेले नाहीत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करत आहेत. 

Web Title: FIR filed against Azam Khan in case of defamation of Shia religious leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.