दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:12 AM2018-03-02T06:12:36+5:302018-03-02T06:12:36+5:30

दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

The fight against terrorism is not against any religion | दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही

दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही

googlenewsNext

नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्धची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर, तरुणांची दिशाभूल करणा-या मानसिकतेविरुद्ध आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन यांच्या उपस्थितीत इस्लामिक हेरिटेज या विषयावर एका समारंभात बोलताना मोदी म्हणाले की, आमचा वारसा, मूल्य याची अशी एक ताकद आहे ज्याच्या बळावर आम्ही हिंसा आणि दहशतवाद यासारखे आव्हाने पार करु शकतो. भारताला त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. या देशात जगातील प्रत्येक धर्माला आणि विचारसरणीला आश्रय देऊन येथे आदराचे स्थान दिले आहे.
गौतम बुद्धाच्या काळापासून भारताने जगाला शांतता व सलोख्याचा संदेश दिला आहे. आमचा असा प्रयत्न आहे की, सर्वांच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे. भारतात लोकशाही एक राजकीय व्यवस्था तर आहेच. पण, समानता, विविधता आणि सामंजस्य यांचा मूळ आधार आहे. मोदी यांच्या विचारांशी सहमती दाखवत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले की, धर्म सर्वांवर प्रेम करायला शिकवितो. सर्व शेजाºयांना सोबत घेऊन चालायला शिकवितो. कट्टरपंथ चिंतेचा विषय आहे. तर, माणुसकी हेच जगाचे मूळ आहे.
>चांगली मूल्ये रुजवावी
दहशतवादाविरुद्धची लढाई ही उदारमतवादी आणि कट्टरपंथ यांच्यातील विचारांची आहे. तिरस्कार पसरविणारे विचार आम्हाला दाबून तरुणांमध्ये उदारमतवाद आणि चांगले मूल्ये रुजवावी लागतील.
जगात शांतता नांदावी आणि सर्वेधर्मीय लोकात स्रेहपूर्ण संबंध वाढविणे ही आमची जबाबदारी आहे, असे राजे अब्दुल्ला व्दितीय बिन अल हुसैन म्हणाले.

Web Title: The fight against terrorism is not against any religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.