सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण, सुप्रीम कोर्टात २ प्रकरणामध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 08:58 AM2024-04-03T08:58:44+5:302024-04-03T09:02:24+5:30

Central Government: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का?

Everyone is surprised by the changed approach in 2 cases in the Supreme Court due to the government's stance on ED, income tax problem | सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण, सुप्रीम कोर्टात २ प्रकरणामध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य

सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण, सुप्रीम कोर्टात २ प्रकरणामध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य

- संजय शर्मा
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का? ही चिंता आता सरकारलाही सतावत आहे काय? गेल्या ४८ तासांत सरकारच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे ईडी आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले.

केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली नसती तर आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक नोटीस पाठवून कारवाई केली नसती. सोमवार हा सर्वोच्च न्यायालयातील संस्मरणीय दिवस असेल. कारण, काँग्रेस पक्षाला पाठवलेल्या ३,५६७ कोटी रुपयांच्या आयकर नोटीसच्या सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष आहे. आयकर नोटीसवरील सुनावणी निवडणुकीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी. आयकर विभागही आता कोणतीही कारवाई करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे वकील आणि नेते अभिषेक मनू सिंघवी यांना सर्वाधिक आश्चर्य वाटले. सिंघवी तर म्हणाले की, ते नि:शब्द आहेत.

संजय सिंह प्रकरणातही विरोध नाही 
आपचे खासदार संजय सिंह यांच्या प्रकरणात ईडीने सुप्रीम कोर्टात संजय सिंह यांच्या जामिनाला साधा विरोधही केला नाही. त्यामुळे संजय सिंह यांना सहज जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना ईडीला विचारत राहिले की त्यांना संजय सिंह यांना आणखी कोठडीत ठेवायचे आहे का? पण ईडीच्या वकिलांनी एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही.  

सरकारच्या भूमिकेत बदल?
हे सर्व केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार होत असल्याची चर्चा आहे. कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता किंवा ईडीचे वकील सरकारच्या सूचनेशिवाय एवढा मोठा निर्णय स्वत: घेऊ शकले नसते. सरकारच्या भूमिकेत बदल झाला असेल तर त्याचे परिणाम आणखीही 
दिसून येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

Web Title: Everyone is surprised by the changed approach in 2 cases in the Supreme Court due to the government's stance on ED, income tax problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.