सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 10:00 AM2019-03-11T10:00:41+5:302019-03-11T10:04:56+5:30

दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

an encounter broke out between security forces and militants in jammu and kashmir pulwama | सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

Next

श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन राबवलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पिंगलिश भागात सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुद्दसिर अहमद खान (23) याचाही खात्मा करण्यात यश आलं आहे. मुद्दसिरनं पुलवामा हल्ल्यादरम्यान गाडी आणि विस्फोटांचा पुरवठा केला होता. मुद्दसिरनं पुलवामातून ग्रॅज्युएशन आणि इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमाही केला आहे.

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, मुदसिर हा पदवीधर असून त्याने आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन व स्फोटके मिळवून दिली होती. त्राल येथील मिर मोहल्ला येथे राहणारा मुदसिरने दोन वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता. त्यानंतर त्या संघटनेच्या नूर मोहम्मद तंत्री या दहशतवाद्याच्या गटात तो सक्रिय झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविण्यात नूरचा मोठा हात होता. डिसेंबर 2017मध्ये तंत्री चकमकीत मारला गेल्यानंतर मुदसिर अहमद खान 14 जानेवारी 2018 रोजी घरातून पळून गेला होता. त्यावेळेपासून त्याने दहशतवादी कारवायाही वाढविल्या होत्या. अखेर त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं आहे. तसेच सुरक्षा जवानांनी सज्जाद या कुख्यात दहशतवाद्याला ठार केलं आहे. 

आणखी दोन हल्ल्यांतही सामील
मुदसिर याने पदवी मिळविल्यावर आयटीआयमधून त्याने इलेक्ट्रिशियनचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता.
या हल्ल्यात सहा जवान शहीद व एक नागरिक ठार झाला होता. लेथपोरा येथे सीआरपीएफ तळावर जानेवारी 2018मध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या प्रकरणीही तपासयंत्रणांना तो हवा आहे.
पुलवामातील हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या पथकाने 27 फेब्रुवारी रोजी मुद्दसिरच्या घरावर धाड टाकली होती. 

Web Title: an encounter broke out between security forces and militants in jammu and kashmir pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.