आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:41 AM2018-09-17T00:41:37+5:302018-09-17T00:42:16+5:30

इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते.

Emergency, serious mistake in the Operation Blue Star - Congress leader Natwar Singh | आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

आणीबाणी, आॅपरेशन ब्लू स्टार या गंभीर चुका- काँग्रेस नेते नटवर सिंह

नवी दिल्ली : १९७५ साली आणीबाणी घोषित करणे व अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात ‘आॅपरेशन ब्लू स्टार’ ही कारवाई करण्यास लष्कराला परवानगी देणे या दोन गंभीर चुका इंदिरा गांधी यांनी केल्या. या गोष्टी वगळल्या, तर त्या अतिशय समर्थ व महान पंतप्रधान, थोर मानवतावादी व्यक्ती होत्या, असे माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांनी म्हटले.
इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते. ८० च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.
सनदी अधिकारी ते परराष्ट्रमंत्री झाल्यानंतरच्या काळापर्यंत त्यांचे निकटवर्तीय, मित्र, समकालीन नेते, सहकारी यांनी त्यांना लिहिलेली पत्रे ‘द ट्रेझर्ड इपिसल’ या नव्या पुस्तकात आहेत. त्यामध्ये नटवर सिंह यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधी गंभीर, रागीट, काटेरी, कठोर होत्या, असे बहुतेक वेळा वर्णन केले जाते. मात्र, त्या इतरांची काळजी वाहणाऱ्या, उत्तम जीवनशैलीची आवड असणाºया होत्या, हे खूपच कमी वेळा सांगितले जाते.

या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी, ई. एम. फॉस्टर, सी. राजगोपालाचारी, लॉर्ड माऊंटबॅटन, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या दोन भगिनी विजयालक्ष्मी पंडित व कृष्णा हाथीसिंग, आर. के. नारायणन, निराद चौधरी, मुल्कराज आनंद आदींनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे.

Web Title: Emergency, serious mistake in the Operation Blue Star - Congress leader Natwar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.