डोळ्यात धूळफेक; ‘आयुष्मान’ विम्याचा फील गुड जुमला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:56 AM2018-05-27T01:56:17+5:302018-05-27T01:56:17+5:30

‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे.

Dust in the eye; Good luck to 'Ayushman' insurance! | डोळ्यात धूळफेक; ‘आयुष्मान’ विम्याचा फील गुड जुमला!

डोळ्यात धूळफेक; ‘आयुष्मान’ विम्याचा फील गुड जुमला!

Next

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - ‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे. देशातल्या ५0 कोटी लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा योजनेद्वारे मिळणार असल्याचे वचन मोदी सरकारने दिले आहे. ही विमा योजना, डोळ्यात धूळफेक करणारे नाटक म्हणायचे की अमित शहांच्या भाषेत चुनावी जुमला!
खासगी व सरकारी रुग्णालयात आज खाटांची संख्या आहे १३ लाख ७३ हजार. खासगी रुग्णालयात ८ लाख ३३ हजार तर सरकारी रुग्णालयात ५ लाख ४0 हजार खाटा. त्यापैकी.७0 टक्के खाटा फक्त निवडक शहरांत आहेत. सरकारी रुग्णालयातल्या बऱ्याच खाटा सेवेसाठी उपयोगाच्या नाहीत, कारण तिथे डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचा-यांची कमतरता आहे. शहरांची ही अवस्था आहे तर तर खेडी अन् निमशहरी गावांची स्थिती किती विदारक असू शकते याचा अंदाज
येऊ शकतो.
देशात १000 लोकांमागे 0.३ ते 0.५ पेक्षा अधिक डॉक्टर्स नाहीत. झांबिया वा गॅबन या अविकसित देशांची स्थिती यापेक्षा चांगली आहे. झांबियात १ हजार लोकसंख्येमागे किमान २.00 तर गॅबनमधे ६.३ खाटा आहेत. भारतात १ हजार लोकांमागे फक्त 0.९ खाटा आहेत. क्युबाची स्थितीही भारतासारखीच होती, मात्र संरक्षण बजेटमध्ये तडजोड करून क्युबाने आरोग्य सेवांना प्राधान्य
दिले.

ओडिशा, छत्तीसगड, राजस्थानच्या ग्रामीण रुग्णालयांमधे ९0 टक्के तर उत्तराखंडात ८५ टक्के स्पेशालिस्ट डॉक्टर्स नाहीत. बिहार व झारखंडात १0 हजारांच्या लोकसंख्येमागे 0.५ जनरल फिजिशिअन आहेत. जे लोक धार्मिक वा जातीपातीच्या वैरातून परस्परांशी भांडत असतात, तेच लोक रुग्णालयांत अपुºया उपचारांमुळे डॉक्टर्सवर हल्ले चढवतात. रुग्णालयात तोडफोड करतात.

ग्रामीण लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ८३ कोटी होती. उपचार करणाºया डॉक्टर्सची संख्या मात्र ४५ हजार ६२ होती. जनगणनेनंतरच्या आठ वर्षात, मोदी सरकारच्या काळातही स्थिती तशीच आहे. कारण आरोग्यासाठी किरकोळ तरतूद केली आहे व तीही खर्च होत नाही. आज ५0 हजारांहून अधिक भारतीय डॉक्टर्स अमेरिकेत आहेत. पंतप्रधानांच्या मेडिसन स्केअरच्या सभेत तिरंगे ध्वज फडकावून ‘मोदी’ ‘मोदी’ असा पुकारा करणाºयांमध्ये हेच डॉक्टर्स आघाडीवर होते. पण येथील विदारक आरोग्य सेवांचे त्यांना सोयरसुतक नाही.

पुरेसे डॉक्टर्सच नाहीत तर आरोग्य विम्याचा उपयोग तरी काय? वाजतगाजत जाहीर झालेला ‘आयुष्मान’ सारखा आरोग्य विमा बेवकूफ बनवण्याचे अवजार आहे. उद्या आजारपणाचे संकट उद्भवलेच्,ा तर खर्च करावा लागणार नाही, याचे समाधान मनात आहे. कारण सरकारने ‘आयुष्मान’ची सोय केली आहे. पण हाही तोंडदेखला ‘फिल गुड’ फॅक्टर आहे. मोदींच्या ‘मन की बात’ द्वारे तुम्हाला असा आनंद वारंवार मिळालाच आहे. दरवर्षी तुमचा खिसा हलका करणारा हा आरोग्य विमा, फारसा केवळ एक रद्दी कागद आहे.

झांबिया व गॅबन या अविकसित देशांपेक्षाही भारतातील स्थिती वाईट

Web Title: Dust in the eye; Good luck to 'Ayushman' insurance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.