‘दांडीबाज’ आमदारांमुळे लोकसभेचा अभ्यासवर्ग ओस!

By Admin | Published: March 3, 2015 12:51 AM2015-03-03T00:51:07+5:302015-03-03T00:51:07+5:30

महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या आमदारांच्या ‘दांडीबाजीने’ लोकसभा सचिवालयापुढे आज महाराष्ट्राची पुरती कोंडी झाली!

Dissatisfaction with the lawmakers, dew! | ‘दांडीबाज’ आमदारांमुळे लोकसभेचा अभ्यासवर्ग ओस!

‘दांडीबाज’ आमदारांमुळे लोकसभेचा अभ्यासवर्ग ओस!

googlenewsNext

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या आमदारांच्या ‘दांडीबाजीने’ लोकसभा सचिवालयापुढे आज महाराष्ट्राची पुरती कोंडी झाली! अखेर, १२० पैकी अवघ्या २३ आमदारांच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लोकसभेच्या आवारात तीन दिवसांच्या अभ्यासवर्गाला सोमवारी प्रारंभ केला.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहातील मोकळ््या जागांवर नजर टाकत दांडीबाजांना टोले जरी हाणले नाहीत, तरी समाजाने लोकप्रतिनिधीसारखी उपाधी ज्यांना बहाल केली, त्यांनी संसदीय आयुधांच्या कार्यव्यवस्थेपासून वंचित राहून नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राज्य विधिमंडळाचे प्रथमच सदस्य झालेल्या विधानसभा व परिषदेच्या आमदारांचा तीन दिवसांचा अभ्यासवर्ग लोकसभा सचिवालय व ब्युरो आॅफ पार्लमेंटरी स्टडी अ‍ॅण्ड रिसर्चच्यावतीने आयोजित केला आहे. वर्गाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने केलेल्या पाठपुराव्यानंतर १२० नवीन आमदारांनी संमती कळविली. यामध्ये काही नव्या राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजता लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत उद्घाटन, त्यानंतर केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत एक सत्र असे पहिल्या दिवसाचे नियोजन होते. तीन दिवसांत सात मान्यवरांची व्याख्याने आमदारांना ऐकायची आहेत. सुमारे ३०० लोक बसू शकतील अशा त्या सभागृहात सर्वजण मिळून ५२ जण होते.
सुमित्रा महाजन यांनी उद्घाटनाच्या भाषणात अनेक उत्तमोत्तम दाखले दिले. देश, राज्य व आपण हा परस्पर संबंध, लोकप्रतिनिधींसाठी वाचनाचे महत्व कथन केले. गैरहजरीबद्दल लोकमतशी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, आमदारांची आजची उपस्थिती कमी असली तरी उद्या ती वाढेल अशी अपेक्षा करू. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत अलीकडेच भाजपच्या नवीन आमदारांची चार दिवसांची कार्यशाळा झाल्याने येथील उपस्थितीवर परिणाम झाला असावा असे वाटते.

४विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व विधिमंडळाचे प्रधानसचिव अनंत कळसे रविवारी दाखल झाले. शंभर आमदार उपस्थित राहणार म्हणून आठवडाभर संपूर्ण नवीन महाराष्ट्र सदन आमदारांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण गेल्या दोन दिवसात विधानसभा व परिषदेचे मिळून २३ आमदारांनी राजधानीतीत हजेरी लावली.

४यामध्ये प्रामुख्याने अनिल सोले, महादेव जानकर, प्रकाश गजभिये, शिरीष चौधरी, डॉ मिलिंद माने व संगीता ठोंबरे या एकमेव महिला आमदारांंचा समावेश आहे. या साऱ्यांनी सकाळी एक तास लोकसभेतीलील प्रेक्षक दीर्र्घेेतून प्रश्नोत्तरांच्या तासाला हजेरी लावली. त्यानंतर लोकसभा आवारात छायाचित्रे काढली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत दुपारी भोजन केले. त्यानंतर उद्घाटनसत्राला हजेरी लावली.

Web Title: Dissatisfaction with the lawmakers, dew!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.