पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 10:04 AM2019-06-07T10:04:14+5:302019-06-07T10:04:26+5:30

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे.

delhi high court orders to give one third salary to wife after divorce | पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय

googlenewsNext

नवी दिल्लीः पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे. पतीच्या एक तृतीयांश पगारावर पत्नीचा अधिकार असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पतीच्या पगाराच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. पतीच्या पगाराचं वाटत दोन भागात होत असून, एक भाग पत्नीला दिला गेला पाहिजे. एका महिला याचिकाकर्त्याच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. महिलेला पतीच्या पगारातील 30 टक्के हिस्सा मिळालाच पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 

महिलेचं लग्न 7 मे 2006 झालं होतं. तिचा पती सीआयएसएफमध्ये इन्स्पेक्टर आहे. 15 ऑक्टोबर 2006 रोजी दोघेही विभक्त झाले. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. 21 फेब्रुवारी 2008 रोजी पत्नीला पोटगी ठरवण्यात आली. त्याअंतर्गत पतीच्या पगाराचा 30 टक्क हिस्सा पत्नीला देण्याचं ठरलं. या निर्णयाला महिलेच्या पतीनं आव्हान दिलं. त्यानंतर तो भत्ता 30 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्यात आला. त्यानंतर या निर्णयाला महिलेनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

पतीच्या वकिलांनी न्यायालयात पत्नीच्या खात्यात कोण कोण पैसे टाकते, याची माहिती मागवली. तर वडीलही महिलेला खर्चासाठी पैसे देत असल्याचं समोर आलं. परंतु त्यानंतर न्यायालयानं पुन्हा एकदा पत्नीला 30 टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला. पतीच्या पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार महिलेला 30 टक्क्यांच्या लाभ देण्यात यावा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

Web Title: delhi high court orders to give one third salary to wife after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.