भारताच्या दिशेनं वेगानं येतंय फनी चक्रीवादळ, हाय अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:39 AM2019-04-30T11:39:36+5:302019-04-30T11:43:54+5:30

चक्रीवादळ असलेलं फनीचा कहर वाढतच चालला आहे.

cyclone fani become severe storm coming to india high alert | भारताच्या दिशेनं वेगानं येतंय फनी चक्रीवादळ, हाय अलर्ट जारी

भारताच्या दिशेनं वेगानं येतंय फनी चक्रीवादळ, हाय अलर्ट जारी

googlenewsNext

नवी दिल्लीः चक्रीवादळ असलेलं फनीचा कहर वाढतच चालला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळानं उग्ररूप धारण केलं आहे. बुधवारपर्यंत हे चक्रीवादळ भयंकर होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री आयएमडीनं सांगितलं की, हे वादळ श्रीलंकेच्या त्रिनकोमालीपासून जवळपास 620 किलोमीटर पूर्व- उत्तर पूर्व आणि चेन्नईपासून 700 किलोमीटर पूर्व- दक्षिणपूर्व तथा मच्छलीपट्टनमपासून 900 किलोमीटर दक्षिणपूर्वकडे आहे. तसेच हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण(NDRF) आणि भारतीय तटरक्षक दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोदींनीही फनी चक्रीवादळासंदर्भात चिंता व्यक्त केली असून, अधिकाऱ्यांना ते रोखण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची सूचना केली आहे. तसेच या चक्रीवादळाचा ज्या राज्यांना फटका बसू शकतो, अशांना तात्काळ मदत पुरवावी, असंही पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.


फनी वादळामुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा आढावा राष्ट्रीय पेचप्रसंग व्यवस्थापन समितीने (एनसीएमसी) सोमवारी घेऊन राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळेल, अशी खात्री दिली. एनडीआरएफ आणि भारतीय किनारा रक्षक दलाला अति सावध राहण्यास सांगण्यात आले असून, मच्छीमारांनी मंगळवारी फनी वादळ तीव्र स्वरूप धारण करण्याची अपेक्षा असल्यामुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. 

Web Title: cyclone fani become severe storm coming to india high alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.