सुनंदांच्या गूढ मृत्यूप्रकरणी शशी थरूरांवर खटला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 03:17 PM2018-06-05T15:17:12+5:302018-06-05T15:22:35+5:30

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना आरोपी ठरवलं आहे.

Congress's Shashi Tharoor To Face Trial In Wife Sunanda Pushkar's Death | सुनंदांच्या गूढ मृत्यूप्रकरणी शशी थरूरांवर खटला चालणार

सुनंदांच्या गूढ मृत्यूप्रकरणी शशी थरूरांवर खटला चालणार

Next

नवी दिल्ली- काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना आरोपी ठरवलं आहे. न्यायालयानं समन्स बजावत 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, न्यायालयानं चार्जशीटच्या आधारे शशी थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. काँग्रेस नेता शशी थरूरविरोधात न्यायालयात ट्रायल सुरू होणार आहे. त्यांना 7 जुलै रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी 3 हजार पानांचं चार्जशीट पटियाळा हाऊस कोर्टात दाखल केलं आहे. त्याच्याच आधारे न्यायालयानं सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरुर यांच्यावर आरोप लावले आहेत.


या प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची पोलिसांनी ब-याचदा चौकशीही केली आहे. शशी थरूर यांच्याविरोधात खटला चालवण्यास पुरेसे पुरावे असल्याचंही दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे. न्यायालयात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलं आहे. सुब्रमण्यम स्वामींनी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांचा हात असल्याचा आरोप केला होता. 

Web Title: Congress's Shashi Tharoor To Face Trial In Wife Sunanda Pushkar's Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.