काँग्रेसकडून लोकसभेची तयारी, 6 राज्यांत प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:54 AM2019-01-02T11:54:01+5:302019-01-02T11:54:47+5:30

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे प्रमुख राजकीय नेते व्यस्त आहेत.

Congress prepares for Loksabha, new faces get opportunity for state president in 6 states | काँग्रेसकडून लोकसभेची तयारी, 6 राज्यांत प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी

काँग्रेसकडून लोकसभेची तयारी, 6 राज्यांत प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी

Next

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून लोकसभा निवडणुकांची रणनिती आखण्यात येत आहे. पाच राज्यांत निवडणूक निकालापैकी तीन राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता येथील प्रदेशाध्यक्ष बदलांच्या हालाचाली सुरु झाल्या आहेत. तर, सोबतच, हरयाणा, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशातही काँग्रेकडून नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे समजते. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे प्रमुख राजकीय नेते व्यस्त आहेत. तर, 8 जानेवारीला संसदेचं हिवाळी अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर, 11 ते 12 जानेवारीला राहुल गांधी विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर राहुल गांधींकडून 6 राज्यातील प्रदेशाध्यांची निवड करण्यात येईल. आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करुन पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसची ही रणनिती असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकानंत काँग्रेसने तीन राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानुसार, राजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री बनले आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे. भूपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे या तीन राज्यांतील प्रदेशाध्यपदी नवीन चेहरा निवडण्यात येणार आहे. तर हरयाणा येथे अशोक तंवर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना बदलण्याची चर्चा सुरू आहे. 

उत्तर प्रदेशमध्येही अध्यक्ष बदलण्याचे निश्चित मानले जात आहे. येथील प्रदेशाध्यक्ष राज बब्बर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी नवीन अध्यक्ष निवडला जाईल. छत्तीसगडचे प्रभारी पीएल पुनिया उत्तर प्रदेशमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेसचे संघटनेचे एक महासचिव पद रिक्त आहे. अशोक गहलोत मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक नेते या पदासाठी लाईनीत उभे आहेत. त्यामुळे हेही पद लवकरच नवीन चेहऱ्याकडे जाईल, असे दिसून येते. 
 

Web Title: Congress prepares for Loksabha, new faces get opportunity for state president in 6 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.