...तेव्हा काँग्रेसनं मला 25 लाखांची दिली होती ऑफर- ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:51 AM2018-11-20T11:51:48+5:302018-11-20T12:35:17+5:30

मआयएमचे असदुद्दीन औवेसी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या स्वतःच्या अहंकाराचा गर्व झाला आहे.

Congress offered me Rs 25 lakhs to cancel my rally here(Nirmal)-: Asaduddin Owaisi in Nirmal | ...तेव्हा काँग्रेसनं मला 25 लाखांची दिली होती ऑफर- ओवैसी

...तेव्हा काँग्रेसनं मला 25 लाखांची दिली होती ऑफर- ओवैसी

Next

तेलंगणा- एमआयएमचे असदुद्दीन औवेसी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसला स्वतःच्या अहंकाराचा गर्व झाला आहे. परंतु काँग्रेस मला कधीही विकत घेऊ शकत नाही, असा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीनं ओवैसी यांनी केले आहेत. मी निर्मलनगरमधली रॅली रद्द करावी यासाठी काँग्रेसनं मला 25 लाखांची ऑफर दिली होती. परंतु मी कोणाच्याही आमिषाला बळी न पडता निर्मलनगरची रॅली करणार असल्याचंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.



गेल्या काही दिवसांपूर्वी ओवैसी यांनी राजस्थानातील राजसमंद येथील हत्याकांडाचा हवाला देत मोदींना लक्ष्य केलं होतं. भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिमांवरील हल्ल्यांच्या घटना वाढतायत. मुस्लिमांसह अल्पसंख्याकांवर निशाणा साधला जातोय. मुस्लिम असल्यामुळे आमच्यासोबत असा दुजाभाव केला जातोय, असंही ओवैसी म्हणाले होते.

राजस्थानातील राजसमंद येथील एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शंभूलाल रेगर नामक व्यक्ती एका मुस्लिम व्यक्तीवर पाठीमागून हल्ला करताना पाहायला मिळतंय. त्यानंतर त्या व्यक्तीला जिवंत पेटवण्यात आलं. शंभूलालनं लव्ह जिहाद रोखण्यासाठी असं केल्याचं सांगत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. पोलिसांनी शंभूलाल या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकारावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हत्या करण्यात आलेला माणूस हा पश्चिम बंगालमधील मालदा येथे वास्तव्याला होता. त्यानंतर त्या मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबीयांना पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारनंही मदत जाहीर केली होती.

Web Title: Congress offered me Rs 25 lakhs to cancel my rally here(Nirmal)-: Asaduddin Owaisi in Nirmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.