काँग्रेस म्हणजे 'बेल'गाडी, जयपूरमध्ये मोदींकडून काँग्रेस नेते टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 07:27 PM2018-07-07T19:27:12+5:302018-07-07T19:34:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयपूर येथील कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपचे नाव घेताच काहींची झोप उडते. मोदी आणि वसंधुरा राजे यांचे नाव ऐकताच अनेकांना ताप येतो. त्यांना अशा विकास कार्यक्रमांची एलर्जी असल्याचे मोदींनी म्हटले.

Congress is 'Belgaadi', in Jaipur Congress leader targets Modi | काँग्रेस म्हणजे 'बेल'गाडी, जयपूरमध्ये मोदींकडून काँग्रेस नेते टार्गेट 

काँग्रेस म्हणजे 'बेल'गाडी, जयपूरमध्ये मोदींकडून काँग्रेस नेते टार्गेट 

Next

जयपूर-  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयपूर येथील कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपचे नाव घेताच काहींची झोप उडते. मोदी आणि वसंधरा राजे यांचे नाव ऐकताच अनेकांना ताप येतो. त्यांना अशा विकास कार्यक्रमांची अॅलर्जी असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि पी.चिदंबरम यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काँग्रेस म्हणजे बैलगाडी नसून 'बेल'गाडी बनल्याचे मोदी म्हणाले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळविणाऱ्या लाभार्थींसोबत मोदींनी जयपूरमधील कार्यक्रमातून संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदींनी काँग्रेसला बेलगाडी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांना आपल्या पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तसेच माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही आयएनएक्स मीडिया केसप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला. तर यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही जामीन घ्यावा लागला होता. त्यावरुन मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसची अवस्था बैलगाडी नव्हे तर बेलगाडी अशीच झाल्याचे मोदी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्याहस्ते 2100 कोटींच्या 13 योजनांचे डिजिटल माध्यमाद्वारे उद्घाटन करण्यात आले. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्धिष्ट असल्याचे मोदींनी सांगितले. 

Web Title: Congress is 'Belgaadi', in Jaipur Congress leader targets Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.