मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चोरट्यानं केला हात साफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 20:24 IST2017-10-12T18:38:48+5:302017-10-12T20:24:10+5:30

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी आज दुपारी चोरीला गेली आहे. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला.

Chief Minister Arvind Kejriwal's car thieves thundered his hand | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चोरट्यानं केला हात साफ 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चोरट्यानं केला हात साफ 

नवी दिल्ली - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी आज दुपारी चोरीला गेली आहे. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला. माध्यमांच्या मिळालेल्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांच्याजवळ असलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) गाडी चोरीला गेली आहे. नवी दिल्लीच्या पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहेत. पण त्यामध्ये चोरीचे दृश्य व्यवस्थित दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या गाडीचा वापर करत होते. भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या आयकॉनिक गाडीचा सर्वाधिक वापर केला होता. सध्या ते सरकारी गाडीचा वापर करत आहेत. 

परदेशी राहणाऱ्या भारतीयाकडून ही कार केजरीवालांना भेट मिळाली होती. व्हीआयपी कल्चरचा विरोध म्हणून ह्यआम आदमी पक्षाह्णने या निळ्या व्हॅगन आरचा प्रतिकात्मक वापर केला होता. दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ध्यान कुठे आहे? हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.

Web Title: Chief Minister Arvind Kejriwal's car thieves thundered his hand