देवीच्या भक्तांवर काळाचा घाला, ट्रक-जीपच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:53 AM2018-10-17T10:53:19+5:302018-10-17T10:58:48+5:30

ओडिशातील नुआपाडा येथे मंगळवारी ( 16 ऑक्टोबर ) उशिरा रात्री एक भीषण दुर्घटना घडली. ट्रक आणि जीपची भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाला.

Chhattisgarh : Ten people died after a car collided with a truck in Mahasamund | देवीच्या भक्तांवर काळाचा घाला, ट्रक-जीपच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

देवीच्या भक्तांवर काळाचा घाला, ट्रक-जीपच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

googlenewsNext

छत्तीसगड - ओडिशातील नुआपाडा येथे मंगळवारी ( 16 ऑक्टोबर ) उशिरा रात्री एक भीषण दुर्घटना घडली. ट्रक आणि जीपची भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जीपमधील सर्वजण ओडिशातील कोमना देवीचे दर्शन घेऊन घराकडे परतत होते. यावेळेस काळानं त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण छत्तीसगडमधील महासमुंद येथील रहिवासी होते. मृतांमध्ये जीप चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, सर्व मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.   

(कालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू)


(घरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यूची’ घंटा!; सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक अपघात)

यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एका वाहनाची ट्रकला धडक बसली होती. या अपघातातही 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर 4 जण जखमी झाले होते.  या अपघाताबाबत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं माहिती दिली की, नवरात्री उत्सवादरम्यान बामलेश्वरी मंदिराचे दर्शन घेऊन भाविक घराकडे परत होते. यादरम्यान काळानं त्यांच्यावर घाला घातला.   
 

 

Web Title: Chhattisgarh : Ten people died after a car collided with a truck in Mahasamund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.