मध्य भारताचा प्रवास १७१ कि.मी. ने घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:37 AM2018-08-29T07:37:23+5:302018-08-29T07:42:31+5:30

इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग, जेएनपीटीलाही फायदा

Central India travels 171 km Decreases by | मध्य भारताचा प्रवास १७१ कि.मी. ने घटणार

मध्य भारताचा प्रवास १७१ कि.मी. ने घटणार

Next

नवी दिल्ली : नव्याने होणाऱ्या इंदूर-मनमाड रेल्वेमार्गामुळे मुंबईहून मध्य भारतातील प्रवासाचे अंतर १७१ किलोमीटरने घटणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली मालवाहतुकीचा खर्च, वेळही वाचणार आहे. हा प्रकल्प येत्या सहा वर्षात पूर्णत्वास जाईल.

या ३६२ किलोमीटरच्या मार्गासाठी मंगळवारी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) , रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्यप्रदेश सरकारमध्ये सामंजस्य करार झाला. सध्या इंदूरहून मुंबई, पुणे तसेच जेएनपीटीसारख्या बंदरापर्यंत पोहोचायचे असेल तर बडोदा, सुरतमार्गे जावे लागते. हे अंतर ८१५ किलोमीटर आहे. नव्या मार्गामुळे
हे अंतर १७१ किलोमीटरने घटेल.  या मार्गांचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या इगतपुरी, नाशिक
आणि सिन्नर, पुणे, खेड, धुळे आणि नरडाणा नोडला फायदा होणार आहे.

Web Title: Central India travels 171 km Decreases by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई