भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:07 AM2018-08-02T03:07:03+5:302018-08-02T03:07:17+5:30

वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही.

CBI probe into Bhadan scam; Land given to the rich | भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

भूदानानंतरच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा; धनदांडग्यांना दिल्या जमिनी

Next

नवी दिल्ली : वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. परंतु अलीकडे या जमीनीचे वाटप भूमिहीन व लोकाभिमुख उपक्रमाला न देता धनदांडग्यांना व शिक्षण संस्थांना वितरित केली आहे. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आज वर्ध्याचे रामदास तडस (भाजपा) यांनी लोकसभेत शून्य प्रहरात लावून धरली.
रामदार तडस म्हणाले, की अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांनी संगनमताने या जमिनी श्रीमंत, बिल्डर व संस्थांना विकल्या आहेत. विनोबांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा सेवाग्राममधून ७ मार्च १९५१ ला व आंध्रातील शिवरामपल्ली म्हणजे आजच्या तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्लीमधून केला. त्यांनी श्रीमंतांना जमिनीचा काही भाग भूमिहीनांना देण्याचे आवाहन केले.
आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओडिशा व महाराष्ट्र या राज्यांत ते पायी फिरले. त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु सरकारी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्था यांनी भ्रष्टाचार करून स्वत:च्या फायद्याकरिता जमिनीचा उपयोग केला. त्यामुळे भूदानातून मिळालेल्या जमिनीच्या वाटपातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी.

Web Title: CBI probe into Bhadan scam; Land given to the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.