ईदच्या निमित्तानं 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 10:19 AM2019-06-05T10:19:07+5:302019-06-05T10:19:40+5:30

नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

career narendra modi government gift to five crore minority students muslim youth on eid pradhan mantri scholarship | ईदच्या निमित्तानं 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

ईदच्या निमित्तानं 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Next

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारनं प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली, त्यानंतर मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.

नक्वी म्हणाले, विकासाच्या गाडीला विश्वासाच्या महामार्गावर पळवणे हा येत्या पाच वर्षातील आमचा अजेंडा आहे. जेणेकरून प्रत्येक गरजवंताच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. विश्वासाच्या या हायवेवर कोणताही गतिरोधक किंवा अडथळा येऊ देणार नाही. यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. '3 ई' म्हणजे शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण हे आमचं लक्ष्य आहे. ही लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पढो-बढो हे अभियान चालवलं जाणार आहे. शिक्षणासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार करण्यात येणार असून, देशभर हे अभियान चालवलं जाणार आहे. 


मुस्लिमांना असा मिळणार रोजगार?

रोजगारासाठी आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. शिल्पकार, कारागिरांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न चालवणार आहे. तसेच त्यांना स्वदेशी उत्पादनं ऑनलाइन पद्धतीनं कशी विकता येतील, याचंही प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पाच वर्षांत 25 लाख तरुणांना रोजगारपूरक कौशल्य प्रधान करण्यात येणार आहे. शिका आणि कमवा, गरीब तरुणांना कौशल्य विकास अशा योजनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

Web Title: career narendra modi government gift to five crore minority students muslim youth on eid pradhan mantri scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.