‘फॉर्म-७’ भरून मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:55 AM2019-04-22T05:55:06+5:302019-04-22T05:55:22+5:30

मतदानासाठी यादीत नाव असणे बंधनकारकच

Can not vote by filling 'Form-7' - Election Commission | ‘फॉर्म-७’ भरून मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

‘फॉर्म-७’ भरून मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

googlenewsNext

मुंबई : मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीत नाव नसले तरी फॉर्म-७ भरून मतदान करता येते, या आशयाचा मेसेज व्हाट्सअ‍ॅपसह अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मेसेजमधील माहिती खोटी असून मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

समाजमाध्यमांवर फॉर्म ७ भरून मतदान करता येणार असल्याच्या मेसेजबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. मतदार यादीतील स्वत:चे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी फॉर्म ७ चा अर्ज केला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेण्यासाठी हा अर्ज वापरला जातो. त्यामुळे हा अर्ज भरून कोणालाही मतदान करता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरणाऱ्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव आहे, मात्र मतदार ओळखपत्र नाही, अशा स्थितीत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर अकरा ओळखपत्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Can not vote by filling 'Form-7' - Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.