पीएम मोदींच्या धोरणांमुळे तीन राज्यात विजय: भाजप नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:34 PM2023-12-04T18:34:15+5:302023-12-04T18:34:46+5:30

श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या जीवनावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात विनोद तावडे बोलत होते.

Book launch of 'Jawahar' based on senior freedom fighter and Lokmat founder Jawaharlal Darda | पीएम मोदींच्या धोरणांमुळे तीन राज्यात विजय: भाजप नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया

पीएम मोदींच्या धोरणांमुळे तीन राज्यात विजय: भाजप नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Book launch 'Jawahar' based on senior freedom fighter Jawaharlal Darda: लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि राजकीय-सामाजिक नेते श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी दिल्लीत पार पडला. यावेळी भाजप नेते विनोद तावडेंसह अनेक नेते उपस्थित होते.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल विनोद तावडे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना हा विजय पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांचा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, जातनिहाय जनगणनेला भाजपने पाठिंबा दिला. अमित शहांनी संघटना मजबूत केली आणि जेपी नड्डांनी ती पुढे नेली. एकत्र काम केल्यामुळेच तिन्ही राज्यांमध्ये पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे.

श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या प्रेरणादायी जीवनातील विविध पैलूंवर आधारित 'जवाहर' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, जम्मूचे माजी मुख्यमंत्री आणि काश्मीर लोकशाही पुरोगामी आझाद पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आझाद, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री आलोक मेहता, इ. नेते उपस्थित होते. 

या पुस्तकातून कट्टर गांधीवादी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, गरिबांचे कल्याण आणि दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले, अशा जवाहरलाल दर्डा यांचे आयुष्य उलगडणार आहे. हे पुस्तक येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होण्यापर्यंतचे अनेक टप्पे, संघर्ष आणि नैतिक मूल्यांनी भरलेला त्यांचा जीवन प्रवास पुस्तकात जपला गेला आहे. 

Web Title: Book launch of 'Jawahar' based on senior freedom fighter and Lokmat founder Jawaharlal Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.